गणपतीच्या अनेक आरत्यांपैकी एक लोकप्रिय आरती, शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको. ही आरती गोसावीनंदन म्हणजे मोरया गोसावी यांनी रचली. हिंदीत असूनही महाराष्ट्रात ही आरती प्रसिद्ध आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ही हिंदी देखील नेहमी ऐकतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. कर्णमधुर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली शेंदुर लाल चढायो आरती! मोरया गोसावी १४ व्या शतकातील एक थोर गाणपत्य होते. त्यांची समाधी पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे आहे.
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥२॥
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
भावभगतिसे कोई शारणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥३॥
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥
रचनाकार – गोसावीनंदन (मोरया गोसावी)
शेंदुर लाल चढायो, या आरतीमध्ये मोरया गोसावी यांनी गणपती देवाचे वर्णन तर केले आहेच तसेच गणपतीच्या आराधनाने काय काय प्राप्त होऊ शकते याचेही वर्णन केलेले आहे. ही आरती म्हणताना कधी कधी गणपती स्तोत्राची आठवण येते. ही आरती एकत्रितपणे गाताना खरच तल्लीन व्हायला होते.
संपूर्ण आरती संग्रहासाठी इथे क्लिक करा