दास्तान.. रसिक आणि सीमा ची दास्तान! दास्तान एक फारसी शब्द आहे ज्याचा शब्दशः अर्थ मौखिक इतिहास असा आहे. असा इतिहास जो कुठे लिहून ठेवलेला नाही. ज्यांनी पहिला, अनुभवला त्यांनाच तो समजला! बाकीच्यांसाठी ती फक्त एक घटना असते. दास्तान म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुशिंची म्हणजेच सुहास शिरवळकर यांची आणखीन एक अजरामर कहाणी! आताशा मला सुशिंच्या कादंबरींना […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग ३
जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त […]
जळलेला मोहर – वि स खांडेकर (कादंबरी विवेचन)
वि स खांडेकर यांची कादंबरी वाचणे म्हणजे शब्द – भावनांच्या शांत तळ्यात पाय ठेवून वाङ्मयीन आनंदाचे क्षितिज बघण्यासारखे आहे. जळलेला मोहर ही कादंबरी मांडणी आणि विषय यांच्या बाबतीत, वि स खांडेकर यांनी लिहिलेल्या कादंबरींपैकी अत्यंत वेगळी आहे. शरीर आणि शरीराची भूक हे प्राणिजगतातील अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत विषय आहेत. अर्थातच माणूस देखील यापासून स्वत:ला दूर […]
मनुस्मृति : भेसळ आणि संदर्भहीन दिशाभूल
आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप […]
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले – संत तुकाराम महाराज (भावार्थ)
एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।। गाढव आणि ब्रह्मचर्य संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात […]
ठाकूर कुशाल सिंह राठोड – १८५७ च्या उठावात ब्रिटिशांना आव्हान देणारे ठाकूर
ठाकूर कुशाल सिंह राठोड १८५७ चा उठाव म्हटलं की आपल्याला काही ठराविक नावेच आठवतात. आजच्या दिवसाचा म्हणजेच २१ ऑगस्ट चा इतिहास शोधताना एक पोस्ट दिसली. आणि लक्षात आलं की या वीराचे नाव देखील आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा ठाकूर कुशाल सिंह राठोड यांच्याबद्दल थोडी माहिती मिळवली. अर्थातच इतिहास मोठा विस्तृत असणार आहे. आगामी काळात आणखीन भर […]
बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – बुद्धाचा ऱ्हाटलेखक – उत्तम कांबळे प्रकाशक – मनोविकास प्रकाशन (ISBN 9789385266515)अधिकार – उत्तम कांबळे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ आहे म्हणजेच साधारण १९५०. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्याबरोबर करोडो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला या घटनेच्या पार्श्ववभूमीवर ही कथा घडते. देश स्वतंत्र झाला तरीदेखील आपण स्वतंत्र झालेलो नाही, माणूस झालेलो नाही, वर्षानुवर्षांची जातीची […]
जोन ऑफ आर्क : एका रणरागिणीची करुण कहाणी..
इतिहास आणि फ्रांस इतिहासात असे क्वचितच वाचायला किंवा ऐकायला मिळते की ज्यांनी एखाद्या राजाला, सिंहासन मिळवून दिले त्यांनाच राजाने दगा फटका केला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीत हे खरे आहे की ज्यांनी क्रांती आणली, त्यांनाच अखेर या क्रांतीमध्ये शिरच्छेदाला सामोरे जावे लागले. पण राजांनी असे केल्याचे फारसे ऐकिवात नाही. पण जोन ऑफ आर्क च्या बाबतीत मात्र असेच […]
सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही – आरती प्रभू
“सर्सर सर्सर वाजे” आरती प्रभू यांची एक अप्रतिम निसर्गकविता जिला मानवी अनुभवविश्वाचे संदिग्ध गोंदण लाभले आहे. आरती प्रभू म्हणजे अर्थातच खानोलकर यांच्या कवितेत कायमच एक प्रकारची अस्वस्थता, उणीव आणि रुखरुख जाणवते. आरती प्रभू अस्सल हाडाचे कवी आणि कलावंत होते. एखाद्या कलावंताचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि अनुभवले. कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा मनस्वी कवी नेहमीच […]
पांडवेश्वर – माझे अपूर्ण तीर्थाटण
तारीख २१ फेब्रुवारी. माझ्यासाठी महत्वाचा असलेल्या या दिवशी आम्ही कुटुंबीयांनी थेऊर आणि नंतर मोरगाव येथे जाऊन श्रींचे दर्शन घ्यायचे ठरवले. ही दोन तीर्थक्षेत्रे ठरताच, वडिलांनी आणखीन एका प्राचीन शिवालयाचे नाव सुचवले “पांडवेश्वर”. खरं सांगायचं तर मला पांडवेश्वर या शिवल्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पांडवांनी या शिवालयाचे स्थापना केली अशी आख्यायिका आहे. वडिलांना वर्तमानपत्रे किंवा तत्सम लेखातून […]