“छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” हा मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पाश्चात्य दिनदर्शिकेनुसार आज १७ ऑगस्ट १६६६ (भारतीय दिनदर्शिकेनुसार श्रावण वद्य द्वादशी) छत्रपती शिवाजी महाराज, युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन, यशस्वीरित्या पसार झाले.
ही घटना आजही मराठी मनाच्या अणुरेणूत एखाद्या लेणीसारखी कोरलेली आहे. रावसाहेब देशपांडे या विषयावरील आपल्या पुस्तकात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात, “छत्रपती शिवाजी महाराजांची जर आग्र्याहून सुटका झाली नसती तर मराठ्यांनी काय केले असते?”
या घटनेशी निगडित घटनांवर, व्यक्तींवर ब्लॉगच्या आधारे प्रकाश टाकण्याचे कार्य करत आहोत.