आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून शिवाजी महाराज अनेक गावे, राज्ये आणि वने पादाक्रांत करत शेवटी राजगडला पोहोचले. या प्रवासाबद्दल अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. ते सगळे उल्लेख, इतिहास, किस्से आणि छत्रपती ज्या मार्गाने राजगडला पोहोचले तो मार्ग या ब्लॉग मध्ये एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज – काबुल आणि अफवांचे पीक
काबुल ? “छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” या विषयावर संशोधन करत असताना त्या काळातील पत्रव्यवहारांमध्ये एक फार विचित्र गोष्ट समोर आली. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांना बळजबरीने किंवा एका षड्यंत्रात फसवून “काबुल” ला पाठवणार होता! होय! काबुल ला.. त्या काळच्या दोन पत्रकांमध्ये या गोष्टीचा (अफवेचा!) उल्लेख दिसतो. आम्ही याला “अफवा”च मानतो कारण वास्तव हेच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कधीही काबुल ला गेल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. आम्हालाही ही […]
छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र
हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते.