February 15, 2025
छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे मिर्झा राजे जयसिंग यांना पत्र

Spread the love

छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेवर रावसाहेब देशपांडे यांचे “The Deliverance or The Escape of Shivaji The Great from Agra” हे पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंग यांना लिहिलेले पत्र (इंग्रजी भाषांतर) वाचनात आले. मूळ पत्र (पत्राचे इंग्रजी भाषांतर) गो. स. सरदेसाई यांच्या पुस्तकातून घेतलेले आहे.

Rao Saheb Deshpande (Source)

हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते. आणखी एक गोष्ट जी कैक वेळा आपण विसरून जातो ती म्हणजे छत्रपतींचे, दारा शिकोह बद्दल मत.

आमची (शब्दयात्री) ही इच्छा आहे की आपल्या या महान राजाचे एका दुसऱ्या राजाला लिहिलेले पत्र सगळ्यांसमोर आले पाहिजे. त्यासाठी या पत्राचा मराठी अनुवाद प्रस्तुत करत आहोत. काही ठिकाणी फक्त शब्दशः अर्थ न घेता भावार्थ सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून पत्राचे संदर्भ आणि गर्भितार्थ सगळ्यांसमोर येतील.

वाचकांनी हे पत्र वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे

  • पत्राचा कालखंड आणि मिर्झा राजे जयसिंग, औरंगजेब यांची पार्श्वभूमी
  • मिर्झा राजे जयसिंग, दिलेरखान, औरंगजेबाचे नोकर म्हणून छत्रपतींशी लढायला आलेले होते. घनघोर युद्धानंतर शेवटी नाईलाजाने पुरंदरचा तह झाला.
  • त्या काळात मुघलांकडून, सुलतानांकडून हिंदूंवर केले जाणारे अत्याचार
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वदेश, स्वधर्म, स्वकीय यांविषयीचे प्रेम आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी उचलेले हिंदवी स्वराज्याचे शस्त्र.

काही गोष्टी कदाचित “आजच्या” Political Correctness (राजकीय सभ्यता) मध्ये मोडणार नाहीत. पण म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाच्या पत्रव्यवहाराबद्दल माहिती करून न घेणे अन्यायकारक ठरेल.

1. O Sardar of Sardars, King of Kings, Manager of the mango-trees of the garden of Bharat.
१. हे सरदारांचे सरदार, राजांचे राजे (मिर्झा राजे जयसिंग), भारतवर्षाच्या वाटिकेतील आमराईचे व्यवस्थापक (या सुफलाम देशाचे व्यवस्थापक, मिर्झा राजे मुघल साम्राज्याचे व्यवस्थापक देखील होते!).

2. O piece of the heart and consciousness of Ramchandra, the Rajputs hold up their heads owing to thee.
२. हे प्रभू रामचंद्रांच्या हृदयाचे आणि जाणिवांचे अंश, (आज) सर्व राजपूत आज तुमच्याकडे अभिमानाने बघत आहेत.

3. The grandeur of the Empire of Babar’s dynasty is rendered all the more powerful owing to thee and it is its good fortune to receive thy help.
३. बाबराच्या साम्राज्याची भव्यता तुमच्या मुळे वृद्धिंगत आणि शक्तिशाली झालेली आहे. ते भाग्यवान आहेत की राजे त्यांच्याकडे तुमचासारखे सहाय्यक (मदतनीस) आहेत.

4. O Jay Shah, whose fortune is ever young and whose intellect ever old, be pleased to accept the salutations and blessings of Shiva.
४. ज्यांचे भाग्य चिरतरुण आणि बुद्धी कायम पोक्त (अनुभवाने युक्त) आहे ते, हे (राजे) जयसिंग यांनी माझे (छ. शिवाजी महाराजांचे) अभिवादन स्वीकार करावे.

5. May the Creator of the world protect thee. May He show thee the path of Religion which is Justice.
५. विश्वाचा निर्माता तुमचे रक्षण करो आणि तुम्हाला धर्माचा मार्ग दाखवो जो की न्यायाचा मार्ग आहे.

6. I have heard that thou hast come to make battle upon me and to subjugate the Deccan.
६. आम्ही असे ऐकले की राजे तुम्ही माझ्याशी युद्ध करून दख्खन सर (खालसा) करण्यासाठी आलेले आहात.

7. Thou desirest in this world to make thy face glow with blood drawn from the hearts and the eyes of the Hindus.
७. या तुमच्या महत्वाकांक्षेची परिणीती ही होईल की, तुमच्या चेहऱ्यावरील तेज (अभिमानाची लाली) नक्कीच वाढेल. मात्र ती झळाळी हिंदूंच्या हृदयातील आणि डोळ्यांतील रक्ताने माखलेली असेल.

8. But thou knowest not that thy face is painted in black, because owing to it, this country and religion are in danger.
८. आपल्याला कदाचित ठाऊक नसेल पण राजे आपला चेहरा काळा आहे (लज्जास्पद आहे) कारण, त्याच्यामुळे हा देश आणि धर्म संकटात आलेला आहे. 

9. If thou considerest for a moment or givest thought to thy hands and thy strength,
९. जर आपण एका क्षणासाठी विचार केला किंवा आपल्या बाहुंचा व सामर्थ्याचा विचार केला तर,

10. Then thou whilst discover whose blood lends the glow and what will be the colour of the glow in this world and the next.
१०. तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या तेजाला कुणाचे रक्त कारणीभूत आहे ? (तुम्ही स्वकीयांचे रक्त वाहिले आहे) आणि पुढच्या व त्याच्या पुढच्या जगात (भविष्यात किंवा पुढील जन्मात किंवा मरणानंतरच्या जगात असाही अर्थ होऊ शकतो) त्या तेजाचा रंग काय असेल (होऊ शकेल)?

11. Further, if thou hadst come of thy own accord to conquer the Deccan, my eyes and my head could have been laid on earth for thee to tread upon.
११. याच्याही पुढे सांगतो राजे, जर तुम्ही आपणहून दख्खन जिंकण्यासाठी आले असते, तर आम्ही नतमस्तक झालो असतो. (आमचे डोळे आणि मस्तक पृथ्वीवर तुम्हाला चालण्यासाठी ठेवले असते, असा मूळ उल्लेख आहे पण तो झाला उर्दु – “फारसी भाषेत आँखें और सिर जमीनपर बिछाये होते” चा शब्दशः अनुवाद. आपण भावार्थाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे म्हणून नतमस्तक झालो असतो हा वाक्प्रचार वापरला आहे).

12. I would have marched with my whole force at the stirrup of thy horse and would have yielded up to thee the country from one end to the other.
१२. मी माझ्या सर्वशक्तीसह तुम्हाला सामील झालो असतो राजे (मदत केली असती) आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत संबंध देश मिळवून (जिंकून) दिला असता.

13. But thou hast in fact come to conquer at the instance of Aurangzeb and under the instigation of those who desire to destroy the Hindus.
१३. पण, वास्तविक पाहता तुम्ही (राजे म्हणून न येता) हिंदूंच्या उच्चाटनाची (संपवण्याची) कामना करणाऱ्या औरंगजेबाच्या आज्ञेखातर (त्यांचे नोकर म्हणून) आलेले आहात. 

14. I do not know how I shall deal with thee. If I join thee, there is no manliness in it.
१४. मला हे समजत नाही की मी तुमच्याशी कसे वर्तन ठेवू? तुमच्याशी हातमिळवणी करण्यात कुठलाही पुरुषार्थ नाही!

15. For, brave men are not time servers. The lion pursues not the policy of the fox.
१५. कारण वीरपुरुष काळ आणि वेळ पाहून आपली मूल्ये बदलत नाहीत. एक सिंह, कोल्ह्याची (धूर्त) नीति अवलंबू शकत नाही. 

16. Or, if I lift up the sword and the axe, then the Hindus on both sides will suffer.
१६. की मी खड्ग आणि परशु (कुऱ्हाड) उगारू? (युद्ध करू)? पण तसे करून दोन्ही बाजूंच्या हिंदूंचेच रक्त सांडेल.

17. The greater sorrow is that my sword, which thirsts for the blood of the Mussalmans, should be drawn from the scabbard for some other purpose.
१७. मोठ्या दुःखाची बाब तर ही आहे की जर असं झालं तर, यवनांच्या (मुसलमान राज्यकर्त्यांच्या) रक्ताचा घोट घेण्यासाठी सरसावलेली माझी तलवार, भलत्याच (अयोग्य) कारणासाठी म्यानातून बाहेर येईल. 

18. If the Turks had come to fight this battle, then indeed the prey would have come to the lion in its lair,
१८. जर ते तुर्की (मुघल) स्वतः युद्ध करायला आले असते तर निश्चितच ते शिकार आपणहून सिंहाच्या गुहेत आल्यासारखं झालं असतं.

19. For, they are Rakshasas in the guise of men devoid of justice ang religion, and sinful.
१९. निःसंदेहपणे ते माणसांचा वेष धारण करणारे घोर पापी राक्षस आहेत ज्यांना नान्याय कळतो ना धर्म!

20. When supremacy could not be secured hy Afzul Khan, and Shaista Khan proved no better,
२०. जेव्हा त्यांना असं समजलं की अफजल खान आणि शायिस्ता खान यांना पाठवून देखील (दख्खनवर) वर्चस्व मिळत नाही.

21. Thou art engaged to fight me because he (Aurangzeb) himself is not fit to bear battle with me.
२१. तेव्हा तुम्हाला माझ्याशी युद्ध करायला धाडलं, कारण तो (औरंगजेब) स्वतः माझ्याशी युद्धच करू शकत नाही (भ्याड आहे).

22. He desires that no strong persons should be left surviving among the Hindus in this world,
२२. त्याची ही मनीषा आहे की जगात हिंदूंमध्ये एकही कणखर आणि सामर्थ्यवान उरू नये (जगू नये),

23. That lions may fight among themselves and disabled, so that the fox may rule the forest.
२३. सिंहांनी आपसांत लढून एकमेकांना क्षीण करावं (मारून टाकावं) जेणेकरून कोल्ह्याला जंगलावर अधिपत्य गाजवता येईल!

24. How is it that his secret policy is not transparent to thy brain? It is clear that thou art under the influence of his magic spell.
२४. आश्चर्य याचे आहे की (त्याचा) हा छुपा मनसुबा तुमच्या लक्षात कसा नाही आला? असं दिसतंय की त्याने तुमच्यावर काहीतरी जादूची छडी फिरवलेली आहे (तुमची मति भ्रमित केलेली आहे).

25. Thou hast seen much good and evil in this world; thou hast reaped both flowers and thorns in the garden of life.
२५. तुम्ही आजवर जगाचे विपुल अनुभव घेतलेले आहेत, चांगले आणि वाईट. तुम्ही या आयुष्याच्या वाटीकेतील फुलांचा आस्वाद देखील घेतलेला आहे आणि काट्यांना देखील अनुभवलेले आहे.

26. Is it not meet that thou shouldst fight us-people and bring the heads of Hindus to death?
२६. तुम्ही आमच्याशी युद्ध करणे म्हणजे हिंदूंची मस्तके मृत्यूच्या खाइत लोटण्यासारखे होणार नाही का?

27. After having attained ripe wisdom in action, do not then exhibit (the folly of) youth, but remember the saying of Saadi:
२७. आपल्या कर्तृत्वाने अनुभवसिद्ध झाल्यावर आता पोरकटपणा (अननुभव, अविवेक, अविचार) दाखवू नका. साडी/सादी काय म्हणाला ते लक्षात आहे ना? 

28. “The horse cannot be ridden on all the roads; sometimes discretion is the better part of valour”. (Lit. sometimes it is more fitting to throw down the shield and fly).
२८. “घोडा एकाच वेळी सर्व मार्गांवर (सर्व दिशांना) फिरू शकत नाही. कधीकधी विवेकबुद्धीत देखील मोठे साहस असते.” (कधीकधी शस्त्र खाली ठेवण्यात आणि युद्धापासून दूर जाण्यात देखील वीरता असते).

29. Tigers attack the deer and other animals They do not indulge in a fratricidal war with lions.
२९. वाघ हे, हरीण आणि इतर प्राण्यांवर हल्ला करतात. त्यांना उन्माद करत सिंहाशी लढणं शोभत नाही.

30. Or, if thy cutting sword has true water, if thy prancing horse has true spirit,
३०. जर तुमच्या खड्गातले पाणी खरे असेल (तलवारीला खरोखरच धार असेल), जर तुमच्या वेगवान घोड्यात खरोखरच आत्मा (मानसिक सामर्थ्य, लढण्याची तयारी) असेल तर..

31. Then do thou attack those who are the enemies of religion and abolish Islam root and branch.
३१. तर तुम्ही धर्माच्या शत्रूंवर हल्ला करा आणि (कट्टरवादी) इस्लाम ला समूळ नष्ट करा (वाचकांसाठी – उत्तेजित होऊ नका, पुढील वाक्ये वाचा!).

32. Had Dara Shekoh been King of the country, he would have treated his people with kindness and favours.
३२. दारा शिकोह जर देशाचा राजा झाला असता तर त्याने सर्व प्रजेला दयेने आणि मायेने (कृपादृष्टी ठेवून) वागवले असते.

33. But thou deceivedst Jaswant Singh; thou didst not first consider the high and the low in thy heart.
३३. पण तुम्ही राजे जसवंत सिंग यांना फसवले आणि ते करत असताना तुम्ही योग्य आणि अयोग्य याचा विचार जराही मनात आणला नाहीत. 

34. Thou art not satisfied with having played the fox and hast come to fight the battle with the lions.
३४. असं दिसतंय की तुम्हाला कोल्ह्यांशी लढायचा उबग आलेला आहे आणि म्हणून तुम्ही आता सिंहाशी दोन हात करायला इथे आलेले आहात.

35. What dost thou get from this running about and labouring under the Sun? Thy desires head thee to a mirage.
३५. उन्हात विनाकारण भटकण्याने आणि शक्ती खर्च करण्याने काय साध्य होणार आहे? तुमची महत्वाकांक्षा तुम्हाला मृगजळाकडे ओढून नेत आहे.

36. Thou art even as a mean creature who exerts his utmost and captures a beautiful damsel,
३६. तुमची अवस्था त्या क्रूर पशूसारखी झालेली आहे जो सर्वशक्तीनिशी एका सुंदर स्त्रीचे मन जिंकतो.

37. But, instead of tasting the fruit of that garden of beauty himself, delivers it into the hands of his rival.
३७. पण स्वतः त्या स्त्रीबरोबर राहायचं सोडून, तिचा सांभाळ करायचं सोडून, तिला आपल्या शत्रूच्या स्वाधीन करतो!

38. How canst thou feel proud at the mercy of that mean man? Dost thou know how the services of Johar Singh were rewarded?
३८. तुम्हाला अशा त्या क्रूर माणसाच्या स्वाधीन राहण्यात काय धन्यता वाटते? त्याने जोहरसिंग राजे यांच्या सेवेची कशी परतफेड केली हे आपण जाणता. 

39. Dost thou know by what means he desired to bring calamities to Prince Chhatra Sal?
३९. तुम्हाला माहित आहे त्याला युवराज छत्रसाल यांच्या राज्यावर काय आणि कुठले संकट आणायचे आहे?

40. Dost thou know what calamities that sinful man has left inflicted on other Hindus also?
४०. तुम्हाला हे ही माहित आहे की त्या क्रूर माणसाने इतर हिंदूंवर देखील किती आणि कसे अत्याचार केलेले आहेत?

41. I believe that thou hast attached thyself to him and hast laid down for him the self-respect of thy family.
४१. मला वाटतं की तुम्ही स्वतःला पूर्णतः त्याच्या स्वाधीन केलेलं आहे आणि हे करत असताना तुमच्या कुळाचा स्वाभिमान देखील त्याच्या स्वाधीन केलेला आहे. 

42. But what is the value of this net in which thou art caught for the sake of the Rakshasa? This bond that binds thee is not stronger than the cord of the paijama that you wear.
४२. पण, या जाळ्याला काय अर्थ आहे (मूल्य आहे) ज्यात तुम्ही राक्षसांच्या तावडीत स्वतःला अडकवून घेतलेलं आहे? लक्षात घ्या या जाळ्याची दोरी तुमच्या पायजाम्याच्या नाडीपेक्षा मजबूत नाहीये.(अजूनही तुमच्यात स्वाभिमान आहे, अजूनही तुम्ही स्वाभिमान घट्ट धरून कुळाच्या अब्रूचे रक्षण करू शकता!).

43. In order to attain his ends, he hesitates not to shed the blood of his brother, or to take the life of his father.
४३. स्वतःच्या उच्चाकांक्षेसाठी त्याने बिनदिक्कत आपल्या बंधुंचे, इतकेच काय तर आपल्या वडिलांचे देखील रक्त सांडले (मारून टाकले)

44. Or, if thou appealest to loyalty, remember thou also thy conduct in reference to Shah Jahan.
४४. किंवा, जर तुम्हाला निष्ठेचे भान असेल तर शाहजहांच्या संदर्भात तुमचे आचरणही आठवा.

45. Fate has endowed thee with any intellect or if thou seekest to pride thyself on thy manhood or manliness,
४५. नशिबाने तुम्हाला बुद्धिसामर्थ्य लाभलेले आहे. पण जर तुम्हाला स्वतःच्या पुरुषत्वाचा अभिमान बाळगायचाच असेल तर..

46. Then do thou heat thy sword at the fire of distress of the land thou wast born in, and wipe off the tears of the unhappy ones who suffer from tyranny.
४६. तर तुमच्या तलवारीला स्वकीयांच्या दुःखाच्या, पिडेच्या आणि यातनांच्या दाहात गरम करा, आणि अत्याचाराने पीडित जनतेच्या अश्रुंना कापून टाका (पुसून टाका).

47. This is not the time for fighting between ourselves since a grave danger faces the Hindus.
४७. हिंदूंसमोर मोठे संकट उभे ठाकले असताना आपसांत युद्ध करण्याची ही वेळ नव्हे.

48. Our children, our country, our wealth, our God, our temples and our holy worshippers,
४८. आपले वंशज (मुले), आपला देश, आपली संपत्ती, आपले देव, आपली मंदिरे आणि आपली साधु-संत-भक्त मंडळी 

49. Are all in danger of existence owing to his machinations and the utmost limit of suffering, that can be borne, has been reached.
४९. या सगळ्यांचे अस्तित्व, त्याच्या (औरंगजेबाच्या) कारस्थानांमुळे अत्याचारांमुळे धोक्यात आलेले आहे. त्याच्या अत्याचारांनी आता परिसीमा गाठलेली आहे. 

50. If the work goes on like this for some time, there will not remain a vestige of ourselves on the earth.
५०. हे जर असेच चालू राहिले तर आपण (स्वकीय) या जगातून उठू (आपला सर्वनाश होईल).

51. It is a matter of supreme wonder that a handful of Mussalmans should establish supremacy over this vast country.
५१. ही मोठी आश्चर्याची बाब आहे की हातावर मोजण्याइतक्या मुसलमान शासकांनी इतक्या मोठ्या देशावर वर्चस्व स्थापित केले आहे.

52. This supremacy is not due to any valour on their part. See, if thou hast eyes to see.
५२. तुम्ही जर डोळे उघडून पाहायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की त्यांनी हे वर्चस्व आपल्या पराक्रमाच्या जोरावर मिळवलेले नाही.

53. See, what policy of duplicity he plays with us, how differently he colours his face from time-to time.
५३. त्याची (औरंगजेबाची) दुतोंडी नीति पहा, कशाप्रकारे काळानुरूप तो (सरड्याप्रमाणे) आपले रंग बदलतो (अविश्वसनीय आहे).

54. He claps our own chains to our feet; & cuts our heads with our own swords.
५४. तो आपल्याच साखळ्यांनी आपल्याला जायबंदी करतो आणि आपल्याच तलवारीने आपले शिरच्छेद करतो (आपल्याला आपसांत लढवतो).

55. The most strenuous efforts should be made at this time to protect Hindus, Hindusthan find the Hindu Religion.
५५. आपण हिंदू समाज, हिंदुस्थान यांच्या रक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे आणि हिंदू धर्माची पुनःस्थापना केली पाहिजे.

56. I desire to make an effort and bring about stability and strive my utmost for the sake of the country.
५६. देशात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी मी प्रयत्न करण्यास तत्पर आहे आणि देशासाठी सर्वकाही करायला सज्ज आहे.

57. Polish thy sword and thy intellect and prove thyself a Turk to the Turks.
५७. तुमच्या तलवारीला आणि बुद्धीला धारदार बनवा आणि हे सिद्ध करा की तुम्ही त्या तुर्की लोकांवर देखील तुर्क आहात. (मुघलांपेक्षा अधिक योग्य आणि सामर्थ्यवान आहात).

58. If thou joinest hands with Jaswant Singh and divestest thy heart of the layers of trickery,
५८. जर आपण जसवंसिंगबरोबर हातमिळवणी केली आणि आपल्या अंत:करणातल्या फसव्या थरांना सोडलंत आणि..

59. And if thou bringest about’ unity with the Raj Rana (of Mewar), then indeed there is hope for great things.
५९. आणि तुम्ही जर मेवाडच्या राजा राणा यांच्याशी संधी केली तर (देशाच्या दृष्टीने) निश्चितच काही भव्य दिव्य गोष्टी (घटना) घडण्याची संभावना वाढेल. 

60. Do you all rush and fight from all sides; tramp down that serpent under the rock;
६०. तुम्ही सर्व दिशांनी एकत्रितपणे हल्ला करून त्या सर्पाला दगडाखाली ठेचले पाहिजे. 

61. So that he may for some time occupy himself with ruminating on the consequences of his own actions; and may not further entangle the Deccan in his meshes;
६१. जेणेकरून तो काही काळ स्वत: च्या कृतींच्या परिणामांवर पश्चात्ताप करू शकेल, आणि दख्खन ला पुन्हा आपल्या विळख्यात पकडणार नाही.  

62. And I may in the meantime with the aid of these and other land bearing heroes make away with the other two Sultans (of Bijapur and Golkonda);
६२. आणि त्याचवेळी मी माझ्या शूरवीर सरदार साथीदारांना घेऊन दोन्ही सुल्तानशाहींशी (विजापूर आणि गोळकोंडा) चाल करू शकेन. 

63. So that I may rain the shower of swords from the thundering clouds of my army on the Mussalmans;
६३. जेणेकरून मी या मुसलमान शासकांवर माझ्या पराक्रमी सैन्याच्या मेघांतून तलवारींचा वर्षाव करू शकेन. 

64. So that, from one end of the Deccan to the other, I may wipe out the name and very vestige of Mahomedanism;
६४. आणि परिणामी दख्खनच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत या मुसलमान शासकांचे उच्चाटन करू शकेन.

65/66. Thereafter, with the assistance of wise statesmen and the army, like the river swirling and foaming as it emerges from the mountains of the Deccan, I may come out into the plains;
६५/६६. अशा तऱ्हेने मी (तुमच्यासारख्या) बुद्धिवंत राज्यकर्ता आणि तुमच्या सैन्याचे पाठबळ घेऊन, पर्वतांतून जमिनीकडे खळाळत येणाऱ्या वेगवान आणि फेसाळलेल्या नदीप्रमाणे धावत येईन (सर्वशक्तीनिशी दख्खनवर चाल करून यवनांना परास्त करेन). 

67. And forthwith present myself for service with you, and then after that hear you render your accounts.
६७. आणि तदनंतर मी तुमच्यासोबत (देशाच्या) सेवेत रुजू होईन आणि तुमच्याकडून (तुमच्या शौर्याचे) वर्णन (आनंदाने) ऐकेन. 

68. And then we – four – may again inaugurate a grim war and devote the battlefield to it;
६८. आणि मग आपण चौघे पुन्हा एकदा एकत्र येऊ आणि एक युद्धभूमी सज्ज करू.

69. And then the tide of our armies may be made to reach the crumbling walls of Delhi,
६९. आणि मग आपले सैन्य एकत्र होऊन दिल्लीच्या आधीच पडझड झालेल्या भिंतींना जाऊन भिडतील. 

70. So that nothing may be left of the Aurang (throne) or the Zeb (lust), so that nothing may remain of the sword of his tyranny or the net of his policy of duplicity or dissimulation;
७०. जेणेकरून काहीच उरणार नाही, औरंग (सिंहासन) ही नाही आणि जेब (तेज) देखील नाही! जेणेकरून त्याच्या अत्याचारी तलवारीचा आणि त्याच्या दुतोंडी कारभाराचा व विघटनकारी विचारांचा लवलेशही उरणार नाही. 

71. So that we may flow a river full of pure blood, and with that we may satisfy the souls of our ancestors; and
७१. अशा प्रकारे आपण शुद्ध रक्ताची (पवित्र आचरणाची) नदी वाहून आणू आणि त्याद्वारे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान करू. 

72. With the grace of God, the Just and the Giver of life, we shall entomb him (Aurangzeb) in the bowels of the earth.
७२. प्राणदात्या, दयाळू, परमेश्वरकृपेने आपण त्याला (औरंगजेबाला) जमिनीत गाडू. 

73. If two hearts combine, they can burst a mountain, they can dispel and scatter the whole armies.
७३. दोन मने (हृदय) एकत्र आले तर ते पर्वताला देखील हलवू शकतात, शत्रूच्या संपूर्ण सैन्याची धूळधाण उडवू शकतात. 

74. This is not a very difficult task, we only want good hearts, good eyes, and good hands. These are the really necessary things.
७४. हे तितकेसे अवघड कार्य नाही. गरज आहे ती फक्त, उत्तम मने (हृदय / विचार), योग्य दृष्टी आणि योग्य (शक्तिशाली) हातांची! फक्त यांचीच गरज आहे. 

75. I have much to tell thee in regard to this matter which cannot in sooth be put on paper.
७५. तुमच्याशी या विषयावर बोलण्यासारखं (मजजवळ) खूप काही आहे जे कागदावर (पत्रात) लिहून पाठवणं उचित ठरणार नाही. 

76. I am desirous of having a talk with thee so that no unnecessary pain or labour may be involved.
७६. मला तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी वार्तालाप करण्याची फार इच्छा आहे जेणेकरून अनावश्यक कष्ट आणि यातना टाळता येतील. 

77. If such is thy desire, I shall come to thee and hear what thou hast to say.
७७. तुमचीही हीच इच्छा असेल तर मी तुम्हाला भेटायला आणि तुमचे विचार ऐकायला तयार आहे. 

78. Thy maiden of speech may open her mouth in privacy, and I may take guard against the words being divulged;
७८. आपण कदाचित खाजगीत तुमचे मनोगत व्यक्त करू शकाल आणि मी भेसळयुक्त शब्दांपासून स्वतःचे संरक्षण करू शकेन (तुमचे विचार इतर कुणाच्या तोंडून न ऐकता थेट तुमच्याकडून ऐकता येतील).

79. So that we put our hands to the plough of effort and practise some incantation on that mad Rakshasa.
७९. जेणेकरून आपण एकत्रितपणे (हातमिळवणी करून) या प्रयत्नांच्या नांगराला उचलून त्याचा प्रयोग त्या विक्षिप्त राक्षसावर करू शकू. 

80. I swear by my sword, by my horse, by my country, and by my religion, that no harm shall befall thee in this.
८०. मी माझ्या खड्गाची, घोड्याची, देशाची (जन्मभूमीची) आणि माझ्या धर्माची शपथ घेतो की या सगळ्यात तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही.

81. Or, we may find out some other way to attain our object and make our names in this world and the next.
८१. किंबहुना आपण सगळे एकत्र येऊन आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्य मार्ग शोधून या लोकात (भूलोकात) आणि पुढील लोकात (भविष्यात/स्वर्गलोकात) आपली किर्ती प्रस्थापित करू शकू. 

82. Be not suspicious owing to the incident of Afzul Khan—the report spoke not truly.
८२. अफजल खानाच्या घटनेला भुलू नका, कधी कधी काही खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. 

83. He had secretly kept twelve hundred warlike Habsee cavalry to accomplish my death.
८३. त्याने (औरंगजेबाने) मला मारण्यासाठी गुप्तपणे बाराशे लढाऊ हबशींची फौज उभी केलेली आहे हे मी जाणतो. 

84. Had I not raised my arm against him first, who would have written this letter to you?
८४. जर मी आधीच त्याच्या विरुद्ध माझे हात उचलले नसते (शस्त्र उचलले नसते) तर तुम्हाला हे पत्र कोणी लिहिले असते?

85. But I do not believe any such thing of you; there is no inherent enmity between us.
८५. पण मला तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शत्रुत्वाची भावना नाही, आपल्यात कोणतीही शत्रुता नाही. 

86. Or, if I receive the desired reply from thee, I shall present myself before thee alone at night,
८६. जर आपण मला (माझ्या पत्राला, प्रस्तावाला) यथोचित उत्तर दिले तर मी स्वतः एकट्याने (कुठलेही सैन्य, फौज न घेता) तुम्हाला भेटायला रात्री येईन. 

87. And I will show thee the secret letters which I cleverly extracted from Shaista Khan,
८७. तेव्हा मी तुम्हाला शायिस्ता खानाकडून शिताफीने प्राप्त केलेली काही गुपित पत्रे देखील दाखवेन.

88. So that I may remove all doubts from thy mind and rouse thee from thy sweet sleep;
८८. आणि तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करू शकेन आणि तुम्हाला ग्लानीतून जागे करू शकेन (निद्रावस्थेतून बाहेर काढू शकेन). 

89. I may show thee the true result of thy dreams and then receive any answer;
८९. तुम्हाला तुमच्या (दिवास्वप्नांचे) स्वप्नांचे परिणाम दाखवू शकेन आणि मग तुमचे उत्तर ऐकेन.

90. Or, if this letter does not appeal to thee, then indeed I am ready with my sword to deal with thy army.
९०. आणि (राजे) जर या पत्रात (वार्तालापात) तुम्हाला स्वारस्य नसेल तर तुमच्या सैन्याशी लढायला मी माझ्या खड्गानिशी सज्ज आहे!

91. Tomorrow, the moment the sun shall conceal his face behind the evening cloud, the crescent moon of my sword shall flash forth. That is all. God be with thee.
९१. उद्या जेव्हा संध्याकाळच्या मेघांमागे सूर्य लपेल (सूर्यास्त होईल) तेव्हा माझ्या तलवारीची चंद्रकोर तळपू लागेल. इतकेच सांगणे आहे. देव तुमच्याबरोबर राहो (तुमचे कल्याण करो). 

Reproduced from the Shivaji Souvenir 3-5-1927. pages 172 to 178, written by Mr. G. S. Sardesai
हे पत्र श्री. गो. स. सरदेसाई यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांची स्मरणिका ३-५-१९२७, पृष्ठ क्र. १७२ ते १७८ मधून घेतलेले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका” – ब्लॉग मालिका

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *