हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, मिर्झा राजे जयसिंग यांना, पुरंदरच्या तहाच्या आधी लिहिलेले होते. या पत्रातून छत्रपतींचे बुद्धीचातुर्य, दूरदृष्टी, देशभक्ती, धर्मनिष्ठा,राजकारणाची उत्तम जाण, अत्याचारी यवनांबद्दल असलेली चीड आणि स्वदेश-स्वधर्म-स्वकीय यांच्यासाठी लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रखरपणे दिसून येते.