काल म्हणजे २४ नोव्हेंबर २०२२, मी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी इतिहासात काय झालं याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. तेव्हा मला हे पान सापडले. या पानावर Jeremiah Horrox या खगोलशास्त्रीच्या मित्राला म्हणजे William Crabtree नावाच्या एका विणकाराला Transit of Venus किंवा शुक्राचे पारगमन बघताना दाखवले आहे. Jeremiah ने आपल्या मित्राला हे पाहायला सांगितले होते. त्याचे […]
चौकटीतले विश्व – गरज, प्रारब्ध, लाचारी आणि करुणा
चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते हे मी नवीन सांगण्याची गरज नाही. पण कधी कधी एखादा प्रसंग, मनाच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये असा काही बसतो की विचारांची ढवळाढवळ सुरु होते. काही दिवसांपूर्वी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. फिरत फिरत जंगली महाराज रस्त्यावर आलो. बालगंधर्व जवळील फुटपाथवर चालण्याची इच्छा झाली. त्यातल्या त्यात बरा भाग आहे चालण्यासाठी. आधीच काही फोटो, […]
फेरफटका – आजचा काल (Pune Street Photography)
पहाटे उठल्या उठल्या आधी खिडकीतून बाहेर बघितलं, कुठेही ढग दिसत नव्हते! ताबडतोब आवरून बाहेर पडलो. कुठे ते बाहेर पडेपर्यंत निश्चित माहित नव्हतं. बाहेर पडताना प्रभात रोडच्या दिशेने जायचं मनात होतं पण बिल्डिंगबाहेर पाय पडताच, ते सरळ अलका टॉकीज चौकाकडे चालू लागले. आणि मनातल्या मनात एक Google Map तयार झाला. अलका चौक, डेक्कन, जंगली महाराज रस्ता […]