गणपतीच्या अनेक आरत्यांपैकी एक लोकप्रिय आरती, शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको. ही आरती गोसावीनंदन म्हणजे मोरया गोसावी यांनी रचली. हिंदीत असूनही महाराष्ट्रात ही आरती प्रसिद्ध आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ही हिंदी देखील नेहमी ऐकतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. कर्णमधुर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली शेंदुर लाल चढायो आरती! मोरया गोसावी १४ व्या शतकातील एक थोर […]
नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥ नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।त्यांची सकलहि पापें […]
गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची |नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |चंदनाची उटी, कुंकुमकेशरा |हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नुपुरें, चरणी घागरिया ॥२॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ […]