ही झेन कथा आहे एशुन नावाच्या झेन शिष्येची. कथा छोटी आहे पण मानवी मनाच्या भित्रेपणाबद्दल, स्वतःची फसवणूक करण्याबद्दल आणि सत्यनिष्ठतेबद्दल बरंच काही सांगणारी आहे. कथा अशी.. एका झेन मठात, अनेक शिष्य जमत असत. एकदा झालं असं की एके वर्षी त्या झेन मठात २० पुरुष शिष्य आणि एकच स्त्री शिष्या होती. ती शिष्या म्हणजे “एशुन”! एशुन […]
झेन कथा मराठीत – सगळं काही सर्वोत्तम ! (Everything’s Best!)
सर्वोत्तम दुकान. चांगले आणि वाईट ही काही अंशी मनाची समजूत देखील आहे. तसेच प्रामाणिक माणसाची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची, निवडण्याची दृष्टी देखील वेगळी असते. मनाने सर्वोत्तम असणे जास्त महत्त्वाचे आहे. अशा मानसिकतेच्या दुकानदाराचे सर्वोत्तम दुकान पाहून झेन गुरूंना देखील ज्ञान मिळाले! जपानी झेन गुरू बानझान यांच्यासमोर घडलेली ही घटना. घटना तशी साधारण आहे पण, त्यातून मिळणारी […]
झेन कथा मराठीत – बायकोचे भूत आणि दाणे (Zen story of Wife’s Ghost and Beans)
ही एक फार जूनी कथा आहे, एका माणसाला त्याच्या बायकोचे भूत दिसत असे. तर झालं असं की.. एक तरुण बायको आजारामुळे मरणासन्न झालेली होती. तिचे तिच्या नवऱ्यावर अतोनात प्रेम असते. जेव्हा तिला जाणीव होते की, मरण जवळ येऊन ठेपलेली असते तेव्हा ती नवऱ्याला सांगते, “माझे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे. मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये आणि तुम्ही देखील माझ्यापासून […]
झेन कथा मराठीत – चोर शिष्य झाला! (Thief Becomes Disciple)
एकदा झेन गुरू शिचिरी कोजुन, आपल्या घरी मंत्रोच्चारण करत बसलेले होते. एक चोर हातात तलवार घेऊन त्यांच्या घरात शिरतो आणि गुरूंना तलवार दाखवून धमकी देतो “सगळे पैसे काढा नाहीतर मी जीव घेईन” शिचिरी गुरू यत्किंचितही विचलित न होता उत्तर देतात “पैसे तिकडे कपाटात आहेत, तिकडून घे माझ्या मंत्रोच्चारात व्यत्यय आणू नकोस” चोर कपाटातून पैसे काढायला […]
झेन कथा मराठीत – गोड फळ (Delicious Fruit)
एकदा एका माणसाच्या मागे एक वाघ लागला. माणूस जीवाला वाचवण्यासाठी जंगलातून पळत सुटला. वाघ पाठलाग करत होता. पळता पळता माणूस एका खोल दरीच्या इथे पोहोचला. वाघ पाठलाग करतच होता. शेवटी तो माणूस त्या दरीमध्ये जाणाऱ्या एका वेलीला धरून दरीमध्ये उतरला. त्याला वाटलं की सुटलो. तो वाघ त्या दरीच्या वर उभा होता. माणूस त्या दरीमध्ये, एका […]
झेन कथा मराठीत – खरंच का !? (Really !?)
झेन गुरू हाकुईन हे एक अत्यंत साधे, सरळ व स्वच्छ चारित्र्याचे म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होते. त्यांच्या घराच्या शेजारी एका भाजीवाल्याचे घर होते. भाजीवाल्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. एके दिवशी अचानक भाजीवाला आणि त्याच्या बायकोला समजतं की त्यांची मुलगी गरोदर आहे! भाजीवाला आणि त्याची बायको अत्यंत रागावतात आणि तिला गर्भातील मुलाचा बाप कोण आहे विचारतात. […]
झेन कथा मराठीत – भरलेला पेला (Empty Cup)
एकोणिसाव्या शतकात जपानमध्ये नान’इन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्यांची ख्याती ऐकून एका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नान’इन यांना भेटायला येतात. प्रोफेसर पाश्चात्य शिक्षण घेतलेले होते. प्रोफेसर, नान’इन यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. झेन गुरू त्यांचे यथोचित स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारतात. “आम्ही तुमच्याकडून झेनबद्दल माहिती घ्यायला. झेनबद्दल शिकायला आलेलो […]
झेन कथा मराठीत – मी संन्यासी का झालो (Why I became a monk?)
वृद्ध झेन गुरू शांत स्वरात म्हणाले,
“कधी वेळ मिळालाच.. तर मी संन्यासी का झालो ही कथा तुम्हाला सांगेन”
झेन कथा मराठीत – कदाचित (Maybe)
“तू खूप नशीबवान आहेस..” इचिरोच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी पटकन बोलला
आणि पुन्हा एकदा इचिरो शांतपणे उत्तरतो.. “कदाचित!”
झेन कथा मराठीत – ओझं (The Burden)
पुढील महिना दोन महिने तो सतत याच विचारात होता की ‘गुरूंनी असं का केलं? धर्म का मोडला?’. त्याला झोप लागत नव्हती, सतत याच प्रश्नाने तो वेढलेला असे.