एकदा एका माणसाच्या मागे एक वाघ लागला. माणूस जीवाला वाचवण्यासाठी जंगलातून पळत सुटला. वाघ पाठलाग करत होता. पळता पळता माणूस एका खोल दरीच्या इथे पोहोचला. वाघ पाठलाग करतच होता.
शेवटी तो माणूस त्या दरीमध्ये जाणाऱ्या एका वेलीला धरून दरीमध्ये उतरला. त्याला वाटलं की सुटलो. तो वाघ त्या दरीच्या वर उभा होता. माणूस त्या दरीमध्ये, एका वेलीला लटकलेला होता. माणूस खाली बघतो तर आणखीन एक वाघ खाली उभा होता आणि सुळे दाखवत या लटकलेल्या माणसाकडे बघत होता.
माणूस घाबरतो आणि वर बघतो तर काय !? दोन उंदीर, एक काळा आणि एक पांढरा त्या वेलीला कुरतडू लागतात. माणसाला काय करायचं कळत नव्हतं. विचारात असताना, त्याला बाजूला वाढलेले एक स्ट्रॉबेरीचे झुडुप दिसले. एका हाताने वेळ पकडून तो माणूस दुसऱ्या हाताने स्ट्रॉबेरी तोडतो आणि खाऊ लागतो.
खाता खाता त्याच्या मनात विचार येतो
“ही स्ट्रॉबेरी किती गोड आहे!”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..