“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
एक पावसाळी रात्र – फांदीवरून उडून गेलेला पक्षी
आभाळाच्या झाडावर मेघांचे घरटे थरथर होते. मला माझा एकांत सहसा सलत नाही पण हा एकटेपणा मात्र खायला उठतो. पाऊस सुरू आहे, संथ.. अविरत जणू त्याला मृत्यूचे भयच नाही. अल्लड झालाय हल्ली म्हणे. विचारांनी मला वेढून टाकलंय म्हणू की मी विचारांचे पांघरूण केलयं म्हणू? प्रत्येक प्रसंग अनुभवांच्या पन्हाळीतून आपली ओल मागे ठेवत वाहतोय, एका अगम्य आणि […]
तुमच्याकडे खरंच वेळ आहे का? एक लघु कथा
अनेकांच्या आयुष्यात घडतात तशा अनपेक्षित, दुःखदायी घटना माझ्याही आयुष्यात घडलेल्या आहेत. आज ज्या माणसाशी बोललो तो अचानक हे जग सोडून गेल्याचं कळतं. मग अशा वेळी आपल्याला ‘काळ’ मुळातच समजलेला नाही याची प्रचिती येते. मनात विचार येतो “खरंच कुणाला आपल्याकडे किती वेळ आहे हे माहित असतं का?” काळापुढे आपलं काहीच चालत नाही.. आणि हा विचार सुरु […]
संभ्रम आणि व्याख्या
त्याला परीघ बनवायची हौस, तिला रेष मारण्याची खोड. शेवटी मी त्यांच्यासाठी अनुभवांचे टिंब काढून दिले आणि म्हणालो आता खेळा! असतात अशा काही प्रश्नकाहूर केविलवाण्या वेळा. त्याने पहिले पाऊल उचलले. पण पाऊल पडण्याआधी तिने सरळ काही टिंबांना छेद दिला. तो स्तिमित झाला पण खचून न जाता काही परीघ बनवू लागला. बघता बघता त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. […]
व्यक्तिपूजा आणि भारतीय समाज
कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला.
कावळे
गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या […]
‘फुले बटाटे आणि मी’ .. !
एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ?
ग्रेस तू का गेलास?
हे आजचं स्वप्न आहे. याला स्वप्न म्हणावं की मनाच्या कुठल्यातरी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका बाळमुठीने लपवलेले एक रंगवलेले पान? अजून बरंच काही विचारायचं होतं मला. खिडकीतून सूर्य हळुहळू लुप्त होताना दिसत होता.पण तेवढ्यात डोळे उघडले आणि…ग्रेस तू का गेलास?