अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥ कोणताही रसिक मराठी माणूस जेव्हा “अवघा रंग एक झाला” हे शब्द स्मरतो किंवा वाचतो तेव्हा चटकन मनात घुमतो तो म्हणजे स्वर्गिय किशोरीताई आमोणकर यांचे स्वर. लहानपणापासून या अभंगाची […]