स्त्री झेन संन्यासी एशून साधारण ६० वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना जाणीव झाली की हा दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे, मृत्यू समिप आलेला आहे! त्यांनी आजूबाजूच्या झेन अनुयायांना सारणासाठी लाकडे गोळा करायला सांगितली. अनुयायी थोडे विचारात पडले पण नंतर त्यांनी लाकडे गोळा केली. हळुहळू चिता बनते. एशून त्या सरणावर जाऊन मध्यभागी बसतात आणि चिंता पेटवायला सांगतात. […]
कलाकाराचा मृत्यु
मला विचाराल तर नोकरदार मध्यमवर्ग स्वतःच्या घरात जन्माला आलेली कला आणि कलाकार यांच्यासाठी एक चिरंतन थडगे आहे. कलाकाराचा खून करून त्यावर आनंदाने भयाची चादर चढवली जाते आणि वर व्यावहारिक परिपक्वतेचे उपदेश एखाद्या नशेप्रमाणे एकदुसऱ्यांना दिले जातात. या थडग्यावर उभे राहून ही अहमामिका सुरू असते आणि कलाकार वास्तविकतेच्या ढिगाऱ्याखाली थडग्यात हुंदके देत असतो आणि विचारत असतो […]