स्त्री झेन संन्यासी एशून साधारण ६० वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना जाणीव झाली की हा दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे, मृत्यू समिप आलेला आहे!
त्यांनी आजूबाजूच्या झेन अनुयायांना सारणासाठी लाकडे गोळा करायला सांगितली. अनुयायी थोडे विचारात पडले पण नंतर त्यांनी लाकडे गोळा केली. हळुहळू चिता बनते.
एशून त्या सरणावर जाऊन मध्यभागी बसतात आणि चिंता पेटवायला सांगतात. इतर अनुयायी पुन्हा विचारात पडतात, काही जण घाबरतात आणि काही दुःखी होतात. पण तरीही एशून ने सांगितल्याप्रमाणे चितेला आग लावतात.
बघता बघता चिता पेट घेते. एशून ध्यानाच्या मुद्रेत बसलेली असते. शांतपणे, हालचाल न करता. ते पाहून एक अनुयायी चिंतेने जोरात ओरडून एशूनला विचारतो
“तुला चटके बसत नाहीयेत का एशून?”
एशून वैतागून उत्तर देते
“तुझ्यासारख्या मूर्ख माणसालाच अशा वेळी हा प्रश्न पडू शकतो!”
आणखीन झेन कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा..