लोकांची अशी धारणा आहे की, परमेश्वराची प्रार्थना करणे म्हणजे प्रत्येक वेळेस मोठ मोठे कर्मकांड, यज्ञ, याग करणे वगैरे. पण हे सत्य नाही. मनात भाव असला पाहिजे. भक्ती असली पाहिजे. या भक्तीपुढे सगळं काही फोल आहे. अशा वेळी अनेक भक्तांना प्रश्न पडतो की जर प्रार्थना येत नसेल, स्तोत्र माहित नसतील किंवा कुठले ग्रंथ माहित नसतील तर काय करावं? याला सोपं उत्तर आहे, हात जोडून परमेश्वरासमोर उभे राहावं आणि देवाला स्पष्टपणे सांगावं, हे देवा मला काही येत नाही, मी अज्ञानी आहे, माझ्याकडून अपराध देखील झालेले आहेत. पण, माझी तुझ्यावर भक्ती आहे, कृपा करून माझ्यावर प्रसन्न हो आणि मला क्षमा कर. खालील प्रार्थना हेच सांगते..
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।
आता या प्रार्थनेचा अर्थ समजून घेऊया
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
(देवा) मला (तुझे) आवाहन जाणत नाही (करता येत नाही), अर्चना जाणत देखील नाही, पूजा सुद्धा जाणत नाही, हे परमेश्वरा मला क्षमा कर
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
हे देवा, मन्त्रहीन (मंत्रोच्चारण नसलेली), क्रियाहीन (कर्मकांडरहीत), भक्तिहीन (परिपूर्ण भक्ती नसलेली), ही माझी पूजा परिपूर्ण होवो ही प्रार्थना
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।
माझ्याकडून रात्रंदिवस हजारो अपराध झालेले आहेत. मला तुझा दास समजून हे परमेश्वरा मला क्षमा कर
संपूर्ण आरती संग्रहासाठी इथे क्लिक करा