सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची |नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |चंदनाची उटी, कुंकुमकेशरा |हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नुपुरें, चरणी घागरिया ॥२॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ […]