ग्रेस! नुसते नाव वाचले तरी माणूस हळूहळू आपल्या विश्वातून एका अव्यक्त भावनांच्या राईत प्रयाण करू लागतो. प्रत्येक शब्द जणू एक लोलक आहे ज्याला अनंत पैलू आहेत. रसिक संदर्भांच्या खिडक्यांतून विविध पैलू बघत बघत एका अनंत प्रवासात निघून जातो. कवी ग्रेस यांच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत हे म्हणणं म्हणजे सूर्याला ‘तो बघा सूर्य’ म्हणण्यासारखं आहे. […]