कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी अनेक अन्योक्ति रचल्या त्यांच्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध अन्योक्ति म्हणजे “कोकिलान्योक्ति”. संस्कृतप्रचुर मराठी म्हटलं की काही हिमालयासम उत्तुंग नावे प्रकर्षाने मनात येतात त्यांच्यापैकी मोरोपंत, वामन पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. अर्थातच ही यादी इथे संपत नाही पण ही हिमालयाची शिखरे आहेत हे मराठीचा रसिक नक्कीच मान्य करेल. आपल्या गंगोत्रीचा हात धरून ज्यांनी मराठीला […]