दसरा आला की मला आपट्याच्या पानांपेक्षा जास्त आठवण येते ती कांचनाच्या पानांची! कवी ग्रेस यांचे एक वाक्य आहे, “रामाच्या वनवासाची खरी भागीदारीण झाली उर्मिला”. कांचनाच्या पानांची मला थोडी फार तशीच गत वाटते. वर्षानुवर्षे लोक आपट्याची पाने म्हणून कांचनाची पाने ओरबाडत आहेत, बाजारात विकत आहेत आणि विकत घेणारे विकत घेत आहेत. एखाद्याने अभागी असावे तरी किती? […]