January 12, 2025
वानोळा वानोळा

वानोळा

Spread the love

माहेरी आलेली लेक, जेव्हा सासरी परत जायला निघते तेव्हा माहेरचे लोक आपल्या लेकीने सासरी रिकाम्या हाती जाऊ नये म्हणून बरोबर “वानोळा” द्यायचे. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आणि घरातील परिस्थितीनुसार कोणत्या वस्तू वानोळा म्हणून द्यायच्या हे ठरवलं जायचं. घरात शेती असेल तर भाज्या, पालेभाज्या, कणसे किंवा शेंगा. फळबागा असतील तर फळे, केळी, नारळ वगैरे. कधी घरातील लोणचं, पापड ह्यांचाही समावेश व्हायचा.

आता वानोळ्यातील पारंपरिक गोष्टींची जागा कॅडबरी, मिठाई, ऑनलाईन भेटवस्तू ह्यांनी घेतली. आजच्या प्रगत, वेगवान आणि पुढारलेल्या जगात माणूस तंत्रज्ञानाने जवळ येतोय पण भावनेनं दूर जातोय आणि हा वानोळा मागे पडतोय.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *