जय देवी जय देवी श्रीदेवी माते ।वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥ श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥ भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।मंगल व्हावे […]
हरतालिकेची आरती – जय देवी हरितालिके। – समर्थ रामदास स्वामी
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥ हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ १ ॥ रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ २ ॥ तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । […]
हनुमंताची / मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।। दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद […]
विठ्ठलाची आरती – येई हो विठ्ठले माझे माऊली ये
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥ आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ २ ॥ विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ ३ […]
विठ्ठलाची आरती – युगे अठ्ठावीस विटेवरी उभा – संत नामदेव महाराज
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी […]
दत्ताची आरती – त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।नेती नेती शब्द न ये अनुमाना॥सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥पराही परतली तेथे कैचा हेत ।जन्ममरणाचाही पुरलासे अंत […]
शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ […]
उदो बोला उदो – देवीची शारदीय नवरात्रोत्सव आरती
“उदो बोला उदो” शारदीय नवरात्रोत्सवातील देवीची एक प्रमुख आरती. नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे महत्व आणि देवीचा महिमा वर्णन करणारी ही आरती! आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो ।। १ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।उदोकारें गर्जती काय […]
देवीची आरती – दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाही ।ते तूं भक्तालागी पावसि लवलाही […]
गणपतीची आरती – शेंदुर लाल चढायो
“शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको” गणपतीच्या अनेक आरत्यांपैकी एक लोकप्रिय आरती. ही आरती गोसावीनंदन म्हणजे मोरया गोसावी यांनी रचली. हिंदीत असूनही महाराष्ट्रात ही आरती प्रसिद्ध आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ही हिंदी देखील नेहमी ऐकतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. कर्णमधुर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली शेंदुर लाल चढायो आरती! मोरया गोसावी १४ व्या शतकातील एक थोर […]