December 2, 2024
हनुमंताची / मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं Hanuman

हनुमंताची / मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं

Spread the love

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

दुमदुमिले पाताळ उठला प्रतिशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

रचनाकार – समर्थ रामदास स्वामी

संपूर्ण आरती संग्रहासाठी इथे क्लिक करा

Click to rate this post!
[Total: 9 Average: 3.2]

2 thoughts on “हनुमंताची / मारुतीची आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं

  1. कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । चूक आहे, कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं । असे आहे, एडिट करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *