प्राणायाम आणि मनुस्मृति प्राणायाम! भारतात (कदाचित आता जगात) प्राणायाम म्हणजे काय? हे माहित नसणारा माणूस क्वचितच सापडेल. आणि सापडल्यास आपणही त्याच्या ज्ञानात वृद्धी करू इतके प्राणायाम उपयुक्त आहे! अनेक योग गुरूंनी प्राणायामाबद्दल शिकवण दिलेली आहे. इतकेच काय, श्रीमद्भगवद्गीतेत देखील प्राणायाम आणि त्याचे योगातील महत्व सांगितलेले आहे. मनुस्मृति मध्ये देखील या इहपरलोकी उपयुक्त प्राणायामचे महत्त्व सांगितलेले […]
अखंड सावधान असावे – समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र
नुकतीच दासनवमी होऊन गेली. श्री समर्थ रामदास स्वामींचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व इतके अगाध आणि प्रचंड आहे की, आमच्या मते अजूनही त्यांची योग्यता पूर्णतः लोकांच्या लक्षात आलेली नाहीये. ऐकीव माहिती, राजकीय कारस्थाने आणि ऐतिहासिक अभ्यासाचा अभाव या विखारी त्रयीनीं अनेक महापुरूषांप्रमाणे समर्थ रामदास स्वामींचे चरित्र देखील सामान्य माणसाच्या आकलनापासून दूर नेवून ठेवलेले आहे. तरीही समर्थांचे इतके […]
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग २ – भुताची सावली
आमच्या सिनेमाच्या साऊंड डिरेक्टरच्या साऊंड स्टुडिओ बद्दल थोडी माहिती मी आधी दिलेली आहे. पण या साऊंड स्टुडिओ मधील माझे अनुभव इथेच संपत नाहीत. आत्तापर्यंत मला या स्टुडिओ मध्ये विचित्र जाणीवा होत होत्या. दरवाज्याचा अनुभव होताच. पण त्यानंतर गूढ आणि गडद जाणीव सोडून विशेष काही घडलं नव्हतं. हळूहळू मला वाटायला लागलं की बहुतेक या जागेत इतकंच […]
चकवा
चकवा.. घटना साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची आहे, मी आणि माझा मित्र सकाळी ११ च्या सुमारास तळजाई टेकडीवर जायला निघालो. आमच्या कॉलेज पासून साधारण ५-१० मिनिटं लागतात. तळजाई देवीच्या मंदिराशेजारी दोन-तीन लहान मोठी चहाची दुकानं होती, त्यापैकीच एक दुकान आम्हा सर्वांचा कट्टा बनला होता, कॉलेज मध्ये कुठे दिसलो नाही तर इथे नक्की दिसणार. रोजचा कट्टा होता. दुचाकीवरून […]
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग १
खिडक्या काळ्या कार्डबोर्डने झाकलेल्या, एक छोटा LED दिवा डावीकडच्या भिंतीवर खाली मन घालून मंदपणे जळत होता. त्याच्या खाली कॉम्प्युटर, माईक इत्यादी साधनसामग्री. धूसर काळोख दाटलेला, बाहेरचे आवाज दबलेले. वेळ दिवसाची असूनही, आत अंधार. अशांत अंधार. एका चित्रपटाच्या अनुषंगाने या साऊंड स्टुडिओ मध्ये जाण्याचा योग आला. एका फ्लॅट चे रूपांतर साऊंड स्टुडिओ मध्ये केलेले आहे. या […]
मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व
मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा […]
झेन कथा मराठीत – संयमी योद्धा
ही झेन कथा आहे एका योद्धाची, संयमी योद्धाची! पूर्वी जपानमध्ये एक उत्तम तलवारबाज होते. त्यांची ख्याती मोठी होती. याला आणखीन एकच कारण म्हणजे, ते झेन मास्टर देखील होते. झेन मास्टर आणि उत्तम तालवारबाज, वयाने ज्येष्ठ आणि प्रावीण्याने श्रेष्ठ त्यामुळे त्यांची चांगलीच ख्याती होती. त्याच काळात आणखीन एक तलवारबाज होता. उत्तम होता. त्याची एक सवय होती. […]
झेन कथा मराठीत – एशुन वर उघड प्रेम
ही झेन कथा आहे एशुन नावाच्या झेन शिष्येची. कथा छोटी आहे पण मानवी मनाच्या भित्रेपणाबद्दल, स्वतःची फसवणूक करण्याबद्दल आणि सत्यनिष्ठतेबद्दल बरंच काही सांगणारी आहे. कथा अशी.. एका झेन मठात, अनेक शिष्य जमत असत. एकदा झालं असं की एके वर्षी त्या झेन मठात २० पुरुष शिष्य आणि एकच स्त्री शिष्या होती. ती शिष्या म्हणजे “एशुन”! एशुन […]
“मूड्स” – सुहास शिरवळकर । खोल आणि अव्यक्त मानवी भावनांचा प्रवास
सुशि म्हणजेच सुहास शिरवळकर यांचा “मूड्स” हा कथासंग्रह म्हणजे खोल आणि अव्यक्त मानवी भावनांचा प्रवास आहे. जेव्हा पुस्तकांच्या रकान्यातून “मूड्स” उचलले तेव्हा त्याच्या मुखपृष्ठावरील चित्र पाहून थोडा स्तंभित झालो. सुशिंच्या पुस्तकावर असे चित्र असण्याची मी अपेक्षा केली नव्हती. पण हे चित्र बघितल्यावर एक गोष्ट तर निश्चित झाली की या पुस्तकातील कथा माझ्याही कल्पनांना आणि विचारांना […]
एक पावसाळी रात्र – फांदीवरून उडून गेलेला पक्षी
आभाळाच्या झाडावर मेघांचे घरटे थरथर होते. मला माझा एकांत सहसा सलत नाही पण हा एकटेपणा मात्र खायला उठतो. पाऊस सुरू आहे, संथ.. अविरत जणू त्याला मृत्यूचे भयच नाही. अल्लड झालाय हल्ली म्हणे. विचारांनी मला वेढून टाकलंय म्हणू की मी विचारांचे पांघरूण केलयं म्हणू? प्रत्येक प्रसंग अनुभवांच्या पन्हाळीतून आपली ओल मागे ठेवत वाहतोय, एका अगम्य आणि […]