लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ […]
उदो बोला उदो – देवीची शारदीय नवरात्रोत्सव आरती
“उदो बोला उदो” शारदीय नवरात्रोत्सवातील देवीची एक प्रमुख आरती. नवरात्रीच्या प्रत्येक तिथीचे महत्व आणि देवीचा महिमा वर्णन करणारी ही आरती! आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो ।। १ ।। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।उदोकारें गर्जती काय […]
देवीची आरती – दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥वारी वारीं जन्ममरणाते वारी ।हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥साही विवाद करितां पडिले प्रवाही ।ते तूं भक्तालागी पावसि लवलाही […]
गणपतीची आरती – शेंदुर लाल चढायो
“शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको” गणपतीच्या अनेक आरत्यांपैकी एक लोकप्रिय आरती. ही आरती गोसावीनंदन म्हणजे मोरया गोसावी यांनी रचली. हिंदीत असूनही महाराष्ट्रात ही आरती प्रसिद्ध आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ही हिंदी देखील नेहमी ऐकतो त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. कर्णमधुर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली शेंदुर लाल चढायो आरती! मोरया गोसावी १४ व्या शतकातील एक थोर […]
गणपतीची आरती – नाना परिमळ दूर्वा
नाना परिमळ दूर्वा शमिपत्रें ।लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ […]
गणपतीची आरती – सुखकर्ता दुखहर्ता
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची |नुरवी, पुरवी प्रेम, कृपा जयाची |सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची |कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा |चंदनाची उटी, कुंकुमकेशरा |हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |रुणझुणती नुपुरें, चरणी घागरिया ॥२॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती |दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ […]
संपूर्ण आरती संग्रह
बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी झाली असेलच. तुम्हा सर्वांसाठी कडून ही भेट. या पानावर एक आरती संग्रह पोस्ट केलेला आहे (मंत्र पुष्पांजली आणि घालीन लोटांगण सहित). या यादीत काही कमी परिचित आरत्या देखील आहेत.
श्रीरामरक्षा स्तोत्र – सोप्या मराठीत अनुवाद
श्रीरामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिकऋषींनी रचले आहे. स्तोत्रात ते नमूद करतात की बुधकौशिकऋषींना हे स्तोत्र भगवान शंकरांनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं आणि त्यांनी उठल्या उठल्या आहे तसं लिहून काढलं. आज संपूर्ण जगात श्रीरामरक्षा स्तोत्र आपत्तीपासून रक्षा करणारे, मनाला आधार देणारे आणि सभोवताली प्रभू रामाचे सुरक्षा कवच बनवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक घरांमध्ये हे श्रीरामरक्षा रोज म्हटले जाते. […]
अबीर गुलाल उधळीत रंग – भावार्थ
अबीर गुलाल उधळीत रंग।नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ धृ ॥ उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन|रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन|पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग॥ १ ॥ वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू।चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ।विठ्ठलाचे नाम घेऊ होउनी निःसंग ॥ २॥ आषाढी-कार्तिकी भक्तजन येती।पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती।चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग॥ ३॥ […]
अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग- भावार्थ
अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥मी तूंपण गेले वायां ।पाहतां पंढरीचा राया ॥२॥नाही भेदाचें तें काम ।पळोनि गेले क्रोध काम ॥३॥देही असोनि विदेही ।सदा समाधिस्त पाही ॥४॥पाहते पाहणें गेले दूरी ।म्हणे चोखियाची महारी ॥५॥ कोणताही रसिक मराठी माणूस जेव्हा “अवघा रंग एक झाला” हे शब्द स्मरतो किंवा वाचतो तेव्हा चटकन मनात घुमतो तो म्हणजे स्वर्गिय किशोरीताई आमोणकर यांचे स्वर. लहानपणापासून या अभंगाची […]