व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “अफलातून” मूळ अरबी शब्द अफलातून (ग्रीक विचारवंत प्लेटो च्या नावाचा अपभ्रंश) वरून आलेला आहे.
प्लेटोच्या नावाच्या अपभ्रंशाचा प्रवास खालील प्रमाणे
प्लेटो – प्लेटोन – फ्लटोन – फ्लातून – अफलातून.
मराठी (आणि इतर भारतीय भाषांमध्ये) अफलातून शब्द एखाद्या विचित्र, किंवा हुशार, अकल्पनीय गोष्टी करणारा या अर्थाने व्यक्ती विशेषण म्हणून वापरला जातो, तसेच अकल्पनीय किंवा अचाट या अर्थाने विशेषण म्हणून वापरला जातो. याचे मुख्य कारण हे की प्लेटो एक अत्यंत हुशार व्यक्ती होता. मराठीत याला फार चांगले पर्यायी शब्द उपलब्ध नाहीत पण अचाट, अकल्पनीय किंवा अफाट असे पर्यायी शब्द वापरले जाऊ शकतात.
शब्द-प्रयोग:
रमेशची कल्पना खरोखर अफलातून होती!
सचिन तेंडुलकर एक अफलातून क्रिकेटपटू आहे.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]