व्युत्पत्ति:
फक्त हा शब्द अरबी शब्द फकत वरून आलेला आहे. अरबीमध्येही फक्त चा अर्थ तोच आहे जो मराठीत आहे. अरबी फकत हा शब्द देखील दोन अरबी शब्द फ (च्या नंतर) आणि कत्तु (कदापि नाही, कधीच नाही) यांची संधी आहे.
शब्द-प्रयोग:
पिशवीत फक्त भाजीच आहे.
मला फक्त एक संधी हवी आहे.
(धनादेशात) पाच हजार दोनशे रुपये फक्त.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]