शब्दयात्री कडून भक्तांसाठी गणपतीची आणखीन एक नितांत सुंदर आरती आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥ पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥ नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥