संत ज्ञानेश्वर महाराज “माऊली” महाराष्ट्राच्या अध्यात्मिक नभांगणातील एक अढळ आणि प्रखर ध्रुवतारा. इतक्या कमी वयात इतकी अध्यात्मिक उंची गाठणं हे फक्त अवतारी पुरुषच साधू जाणे! माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच आजूबाजूचा प्रपातासारखा वाहणारा काळ एका क्षणात सामावून जातो आणि उरते ती […]
मोगरा फुलला – मूळ रचना आणि भावार्थ
मोगरा फुलला.. “मोगरा फुलला.. मोगरा फुलला” संत ज्ञानेश्वर माऊलींनी आंतरिक सुखाच्या अनुभवाचे वर्णन या रचनेत केलेले आहे. कै. लतादीदींचे स्वर कानावर पडले की अध्यात्मिक अमृताचे तुषार अंगावर अलगद पडू लागल्यासारखे वाटते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि लतादीदींचे स्वर हा एक वेगळाच सात्विक योग आहे. कैक वर्षे ही रचना फक्त मराठीच नव्हे तर अमराठी लोक सुद्धा […]