आभाळाच्या झाडावर मेघांचे घरटे थरथर होते. मला माझा एकांत सहसा सलत नाही पण हा एकटेपणा मात्र खायला उठतो. पाऊस सुरू आहे, संथ.. अविरत जणू त्याला मृत्यूचे भयच नाही. अल्लड झालाय हल्ली म्हणे. विचारांनी मला वेढून टाकलंय म्हणू की मी विचारांचे पांघरूण केलयं म्हणू? प्रत्येक प्रसंग अनुभवांच्या पन्हाळीतून आपली ओल मागे ठेवत वाहतोय, एका अगम्य आणि […]