घटकंचुकी – आमचा संदर्भ घटकंचुकी, दोन तीन दिवसांपूर्वीच हा शब्द प्रथम वाचनात आला. इतिहासाबद्दल वाचन करत राहणे हा आमचा आवडता उद्योग. एका बहुचर्चित मराठे – इंग्रज युद्धाच्या पाऊलखुणा आणि सत्यता शोधत होतो. तेव्हा दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्याबद्दल काही साधने वाचत असताना इतिहासाचार्य राजवाडे यांचे “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” हे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकात भारतातील विवाहाच्या, […]
भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर […]