“सुंदरा मनामध्ये भरली” या सुप्रसिद्ध लावणीचे रचनाकार शाहीर रामजोशी! महाकवी मोरोपंत यांनी ज्यांना कविप्रवर म्हणून संबोधले ते रामजोशी. ज्यांच्या काव्यावरून केशवकरणी हा छंद निर्माण झाला ते शाहीर रामजोशी. राम जगन्नाथ जोशी म्हणजेच शाहीर रामजोशी, पेशवेकाळातील एक उत्तुंग कवी, कीर्तनकार. “वेदशास्त्रसंपन्न शाहीर” म्हणवण्याचा मान बहुदा रामजोश्यांनाच मिळू शकेल. सोलापूर येथे एका वेदोक्त ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला […]