“जे कां रंजले गांजले!” संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की या अभंगाचा उल्लेख होणार नाही असं होणं अशक्य आहे. काही काही अभंग, कविता, पदे इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात की त्यातील पंक्ती वाक्प्रचार बनून भाषेचा एक अविभाज्य घटक बनतात. उदाहरणार्थ प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, ठेविले अनंते, बोलाचा भात बोलाची कढी, आलिया भोगासी. याच यादीत आणखीन […]
अगा करुणाकरा (संपूर्ण रचना आणि अर्थ) – संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत प्रसिद्ध तसेच करुणेने ओतप्रोत भरलेल्या अभंगांपैकी एक म्हणजे “अगा करुणाकरा”. भक्तिमार्गाचा उद्गम जरी द्वैतात असला तरीही त्याचे अंतिम ध्येय अद्वैतातच आहे! भक्ताने परमेश्वराशी एकरूप होण्याशी याचा संबंध आहे. परमेश्वर देखील भक्ताची परीक्षा घेत असतो. या परीक्षेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना देखील सामोरे जावे लागले. भक्त तर “भेटि लागी जीवा” म्हणत परमेश्वर प्राप्तीकडे […]