समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता) समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये […]