आपल्या सगळ्यांना हिटलर, त्याची नाझी पार्टी आणि त्याने ज्यूंवर केलेले अनन्वीत अत्याचार यांबद्दल इतिहासाच्या पुस्तकांमधून शिकवलं गेलेलं आहे. पण, जे काही शिकवलं गेलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने. मला हा प्रश्न कायम पडायचा की मुळात हिटलर सत्तेत आलाच कसा? जर्मनीचे लोक तर हुशार समजले जातात. मग त्यांनी अशा क्रूर आणि खुनशी माणसाला निवडून कसं आणलं? त्याने ज्यूंच्या विरोधात चालवलेला प्रचार सगळ्यांना माहिती आहे. पण हिटलरचा […]