December 9, 2024

मराठ्यांचा अपरिचित इतिहास । Unknown History of Maratha Empire

मराठ्यांचा अपरिचित इतिहास
Spread the love

मराठ्यांचा इतिहास हा कायमच मोठा चर्चेचा विषय असतो. बहुतांशी राजकारण हे त्याचे मुख्य कारण आणि त्याच्या आडून काही विशिष्ट लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून आपल्याच इतिहासाबद्दल न्यूनगंड निर्माण करणे हे त्याच्याहून पुढचे कारण. सोशल मिडियाच्या जगात इतिहास एककल्ली विचार पसरवण्याचे, कोणाविषयी अपप्रचार करण्याचे एक अत्यंत विखारी साधन झालेले आहे. या सगळ्या कोलाहलात “इतिहास” मागे पडत आहे आणि कपोलकल्पित कथा इतिहास म्हणून सांगितल्या जात आहेत. त्यांच्याशी लढायचे आहेच पण ते करत असताना तर्कशुद्ध, पुराव्यानिशी सांगता येऊ शकेल असा इतिहास लोकांसमोर आणायचा आहे.

आपल्याला इतिहास म्हणजे काही ठराविक लोक आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना (दुर्दैवाने) इतकंच माहित आहे. तिथेच माझा शोध सुरु झाला. कारण मराठ्यांचा इतका मोठा इतिहास फक्त काही प्रकरणात संपू शकत नाही. नक्कीच आपल्यापासून अनेक गोष्टी लपवल्या गेल्या आहेत. काही लोकांनी मुद्दाम झाकून ठेवल्या आहेत याची खात्री झाली. आणि प्रयत्न सुरु झाला हा अपरिचित इतिहास शिकण्याचा आणि तो लोकांसमोर आणण्याचा. त्याचाच एक छोटा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण आहोत 🙏🏻