एकदा आदी शंकराचार्य आपल्या शिष्यांबरोबर चालत होते. शंकराचार्यांच्या मनात आपल्या शिष्यांच्या विचारांची आणि सत्त्वाची परीक्षा घ्यायचे आले. ते चालले होते त्या रस्त्याच्या कडेला एक ताडीचे दुकान होते. शंकराचार्य काहीही पूर्वसूचना न देता त्या ताडीच्या दुकानात शिरले. त्यांचे शिष्य देखील त्यांच्या मागे दुकानात गेले. शंकराचार्यांनी एक भांडे भरून ताडी प्यायली. त्यांच्या शिष्यांनी सुद्धा एकेक भांडे ताडी […]
गार्गी आणि ब्रह्मज्ञानी
ही कथा आहे महान योगिनी, तत्त्वज्ञानी आणि ऋषिका “गार्गी” ची. गार्गी कायम ज्ञानसंचयात व्यस्त असे. शिकण्याची आणि समजून घेण्याची अत्यंत आवड होती आणि गती देखील होती. तिची किर्ती सर्वदूर पसरलेली होती. एकदा कोणी एक ब्रह्मज्ञानी, एका दूरच्या दुर्गम वनात निवास करत असल्याचे तिला समजले. ज्ञान मिळवण्याच्या आणि त्या ब्रह्मज्ञानींचे दर्शन घेण्याच्या हेतूने ती, त्या वनाच्या […]