काही महिन्यांपूर्वी माझ्या आजीचे दुःखद निधन झाले तेव्हा अंत्यविधी साठी पुण्यातील ओंकारेश्वर येथील घाटावर जावे लागले. आमच्या आस्थेनुसार सर्व दिवसांचे विधी ज्या त्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व दिवसांना अंत्यविधी च्या घाटावर जावे लागले. अर्थातच त्या दिवसात केवळ आमचेच नव्हे तर अनेक दुर्दैवी कुटुंबियांचे विधी घडले. पण त्या दिवसांत त्या घाटावर आणि परिसरात जे काही […]
नेणीव म्हणजे काय?
“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो?
१० नोव्हेंबर हा संबंध भारतात शिवप्रताप दिन म्हणून मानला जातो. या दिवशी १६५९ साली समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर साक्षात प्रभू श्री रामाचे अवतार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान नावाच्या राक्षसाचा वध केला. या घटनेचे वर्णन, जिवा महाला (महाले) यांचे शौर्य, अफझल खानाचे शीर धडावेगळे करणारे संभाजी कावजी, सय्यद बंडा (बंदा) चे वार इत्यादी इत्यादी. […]
माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन
अमरनाथ यात्रा आणि मंदिराबद्दल कोणाला माहिती नाही!? खरं सांगायचं तर प्रवासवर्णन हा काही माझा पुस्तक प्रकारातला आवडता विषय (genre) नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या दुकानातील या विभागाकडे मी बघत सुद्धा नाही. पण, हे प्रवासवर्णन किंवा “यात्रा-वर्णन” देव काकांनी लिहिले असल्यामुळे वाचणे क्रमप्राप्त होते. वाचायला थोडा उशीर झाला हे मात्र खरं पण ते माझ्या आवडी-नावडीमुळे नव्हे तर […]
प्यालो किती तरीही – विंदा करंदीकर
दारू म्हटलं की लोक नाक मुरडतात. पण अशांसाठी गालिब म्हणतो “कंबख्त तू ने पी ही नहीं”. मद्य आणि काव्य यांचा तसाही अगदी वैदिक काळापासून संबंध आहे. प्रत्येक काळातील कवींनी आपापल्या परीने मद्य आणि काव्य यांच्या संयोगाने निर्मण होणाऱ्या आभासी पण पूर्णसत्य दर्शी विश्वाच्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न विंदा करंदीकर यांच्या “प्यालो किती […]
बीज अंकुरे अंकुरे – रसग्रहण आणि भावार्थ
“बीज अंकुरे अंकुरे” कुणाला माहित नसलेला ८० आणि ९० च्या दशकात वाढलेला मराठी माणूस शोधूनच काढावा लागेल. मधुकर पांडुरंग आरकडे यांची ही अप्रतिम कविता! ही कविता मराठी पाठ्यपुस्तकात तर होतीच आणि “गोट्या” नावाच्या मराठी मालिकेचे शीर्षक गीत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे! अशोक पत्की यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलेले आहे. हे गाणे आणि हे शब्द […]
पांढरे हत्ती – कवी ग्रेस – अर्थ आणि भावार्थ
ग्रेस! नुसते नाव वाचले तरी माणूस हळूहळू आपल्या विश्वातून एका अव्यक्त भावनांच्या राईत प्रयाण करू लागतो. प्रत्येक शब्द जणू एक लोलक आहे ज्याला अनंत पैलू आहेत. रसिक संदर्भांच्या खिडक्यांतून विविध पैलू बघत बघत एका अनंत प्रवासात निघून जातो. कवी ग्रेस यांच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत हे म्हणणं म्हणजे सूर्याला ‘तो बघा सूर्य’ म्हणण्यासारखं आहे. […]
मधु मागसि माझ्या सख्या परि – हिंदी अनुवाद
राजकवी भा रा तांबे यांची “रिकामे मधुघट” किंवा लोकांना परिचित असलेले शीर्षक म्हणजे “मधु मागसि माझ्या सख्या परि” ही कविता माहित नसलेला मराठी शोधूनच काढावा लागेल. पण या कवितेचा हिंदी अनुवाद आहे हे किती जणांना माहित आहे? आज जुनी मासिके वगैरे चाळत असताना १९५९ सालच्या, हिंदी डायजेस्ट “नवनीत” मध्ये स्व. पंडित नरेंद्र शर्मा यांनी, मधू […]
काटा रूते कुणाला – कविता, किस्सा आणि रसग्रहण
काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी। मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे! हे शब्द कानी पडताच मराठी रसिकांच्या मनात आणि मुखात “वाह” किंवा “आह” या प्रतिक्रिया अगदी नैसर्गिकरित्या उमटली नाही तर त्याला रसिक म्हणावे की नाही अशी शंका मनात येईल. खरं सांगायचं तर, कवयित्री शांताबाई शेळके मराठी वाङ्मयाला लाभल्या, मराठी मातीत जन्माला आल्या हा एक दैवयोगच […]