अमरनाथ यात्रा आणि मंदिराबद्दल कोणाला माहिती नाही!? खरं सांगायचं तर प्रवासवर्णन हा काही माझा पुस्तक प्रकारातला आवडता विषय (genre) नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या दुकानातील या विभागाकडे मी बघत सुद्धा नाही. पण, हे प्रवासवर्णन किंवा “यात्रा-वर्णन” देव काकांनी लिहिले असल्यामुळे वाचणे क्रमप्राप्त होते. वाचायला थोडा उशीर झाला हे मात्र खरं पण ते माझ्या आवडी-नावडीमुळे नव्हे तर […]
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि त्याचे भारतीयांच्या शिक्षणाविषयी एक पत्र
भारतीय समाजसुधारकांच्या अत्यंत लाडक्या इंग्रजांपैकी एक म्हणजे माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन! हा तोच माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ज्याने मराठ्यांच्या विरोधातील युद्धात इंग्रज फौजेचे नेतृत्व केले होते. आपापल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी एल्फिन्स्टन यांच्या लिखाणाचा आधार घेतात. मानवी इतिहासाचा विचार करता, कोणताही विजयी राजा किंवा विजयी राज्य, पराजिताला आपल्या परीने घडवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येईल. पराजिताचे मनोबल तोडायचे असेल तर आधी […]
कोकिळा वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – कोकिळा वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २६ (चंद्रकांत) + १६ (पादाकुलक) मात्रांची विभागणी – कोकिळा वृत्तात पहिल्या चरणात २६ मात्रा आणि पुढील चरणात १६ मात्रा असतात, त्यामुळे हे अर्धसमवृत्त आहे. यति – चंद्रकांत आणि पादाकुलक यांचे यति नियम लागू पडतात. नियम – पहिल्या चरणात (धृपद) चंद्रकांतच्या २६ […]
प्यालो किती तरीही – विंदा करंदीकर
दारू म्हटलं की लोक नाक मुरडतात. पण अशांसाठी गालिब म्हणतो “कंबख्त तू ने पी ही नहीं”. मद्य आणि काव्य यांचा तसाही अगदी वैदिक काळापासून संबंध आहे. प्रत्येक काळातील कवींनी आपापल्या परीने मद्य आणि काव्य यांच्या संयोगाने निर्मण होणाऱ्या आभासी पण पूर्णसत्य दर्शी विश्वाच्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न विंदा करंदीकर यांच्या “प्यालो किती […]
मर्डर हाऊस आणि अमर विश्वास – सुहास शिरवळकर
सुहास शिरवळकर म्हणजेच “सुशि“, ऍज ही इज नोन टु हिज फॅन्स! खरं तर देवनागरीत इंग्रजी लिहिण्याचे प्रसंग आमच्या आयुष्यात फार येत नाहीत. खरं तर आमची नजर अशा लिखाणाला सरावलेली नाही. वपुंच्या लिखाणात अधून मधून हे जादूचे प्रयोग पाहिले होते. पण, अशा अविष्काराचा सर्रास आणि परिणामकारक व्यवहार बघायला मिळाला तो सुशिंच्या कादंबरीत आणि कथा संग्रहात! मर्डर […]
फटका वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – फटका वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – ३० मात्रांची विभागणी – फटका वृत्तात प्रत्येक चरणात ३० मात्रा असतात, त्यामुळे हे समवृत्त आहे. यति – ८ व्या, १६ व्या आणि २४ व्या मात्रेवर नियम – प्रत्येक चरणात ३० मात्रा चरणांत मात्रांची विभागणी ८+८+८+६ अशी असते. फटका बद्दल माहिती फटका […]
बीज अंकुरे अंकुरे – रसग्रहण आणि भावार्थ
“बीज अंकुरे अंकुरे” कुणाला माहित नसलेला ८० आणि ९० च्या दशकात वाढलेला मराठी माणूस शोधूनच काढावा लागेल. मधुकर पांडुरंग आरकडे यांची ही अप्रतिम कविता! ही कविता मराठी पाठ्यपुस्तकात तर होतीच आणि “गोट्या” नावाच्या मराठी मालिकेचे शीर्षक गीत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे! अशोक पत्की यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलेले आहे. हे गाणे आणि हे शब्द […]
सूर्यकांत (समुदितमदना) वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – सूर्यकांत (समुदितमदना) वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २६ मात्रांची विभागणी – सूर्यकांत (समुदितमदना) वृत्तात प्रत्येक चरणात २६ मात्रा असतात, त्यामुळे हे समवृत्त आहे. यति – ८ व्या आणि १६ व्या मात्रेवर नियम – प्रत्येक चरणात २७ मात्रा चरणांत मात्रांची विभागणी ८+८+८+१+२ अशी असते. सूर्यकांत (समुदितमदना) बद्दल माहिती सूर्यकांत […]
चंद्रकांत (पतितपावन) वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – चंद्रकांत (पतितपावन) वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २६ मात्रांची विभागणी – चंद्रकांत (पतितपावन) वृत्तात प्रत्येक चरणात २६ मात्रा असतात, त्यामुळे हे समवृत्त आहे. यति – ८ व्या आणि १६ व्या मात्रेवर नियम – प्रत्येक चरणात २६ मात्रा चरणांत मात्रांची विभागणी ८+८+८+२ अशी असते (काही ठिकाणी ही विभागणी ८-८-६-४ […]
उपजाति वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – उपजाति वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ + १५ वृत्त अक्षर संख्या – ११ + ११ गणांची विभागणी – त, त, ज, ग, ग (इंद्रवज्रा) + ज, त, ज, ग, ग (उपेंद्रवज्रा) यति – इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा चे यतिचे नियम नियम – उपजाति वृत्तात पहिले चरण इंद्रवज्रा वृत्तात […]