“जे कां रंजले गांजले!” संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की या अभंगाचा उल्लेख होणार नाही असं होणं अशक्य आहे. काही काही अभंग, कविता, पदे इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात की त्यातील पंक्ती वाक्प्रचार बनून भाषेचा एक अविभाज्य घटक बनतात. उदाहरणार्थ प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, ठेविले अनंते, बोलाचा भात बोलाची कढी, आलिया भोगासी. याच यादीत आणखीन […]
मधु मागसि माझ्या सख्या परि – हिंदी अनुवाद
राजकवी भा रा तांबे यांची “रिकामे मधुघट” किंवा लोकांना परिचित असलेले शीर्षक म्हणजे “मधु मागसि माझ्या सख्या परि” ही कविता माहित नसलेला मराठी शोधूनच काढावा लागेल. पण या कवितेचा हिंदी अनुवाद आहे हे किती जणांना माहित आहे? आज जुनी मासिके वगैरे चाळत असताना १९५९ सालच्या, हिंदी डायजेस्ट “नवनीत” मध्ये स्व. पंडित नरेंद्र शर्मा यांनी, मधू […]
साकी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – साकी वृत्त प्रकार – मात्रावृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २८ मात्रांची विभागणी – प्रत्येक चरणात २८ मात्रा यति – १६ व्या मात्रेवर नियम – साकी एक मात्रावृत्त आहे. प्रत्येक चरणात २८ मात्रा असल्याने साकी एक समवृत्त आहे. साकीबद्दल माहिती महाराष्ट्रात प्राकृत भाषिक कीर्तनकारांनी आणि संतांनी विपुल प्रमाणात साक्या रचल्या. याचाच आधार […]
आर्या वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – आर्या वृत्त प्रकार – मात्रावृत्त वृत्त मात्रा संख्या – ३०, २७ मात्रांची विभागणी – पहिल्या चरणात १२, दुसऱ्या चरणात १८, तिसऱ्या चरणात १२ आणि चौथ्या चरणात १५ यति – यतिचे नियम नाहीत. नियम – आर्या वृत्तात अक्षरांचा नियम नसला तरीही गणांचे नियम आहेत. तेव्हाच आर्या पूर्ण मानली जाते. आर्येंत विषम म्हणजे पहिला, […]
दिंडी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – दिंडी वृत्त प्रकार – मात्रावृत्त वृत्त मात्रा संख्या – १९ मात्रांची विभागणी – ९ + १० यति – ९ व्या मात्रेवर नियम – दिंडी वृत्त एक मात्रावृत्त किंवा जाति आहे. दिंडी वृत्तात पंक्तीमध्ये अक्षरसंख्या सामान असण्याची सक्ती नसते. म्हणजे एका पंक्तीत १२ अक्षरे आणि दुसऱ्या पंक्तीत १४ अक्षरे असू शकतात. आणखीन एक […]
कोकिलान्योक्ति – कृष्णशास्त्री चिपळूणकर (संपूर्ण)
कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी अनेक अन्योक्ति रचल्या त्यांच्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध अन्योक्ति म्हणजे “कोकिलान्योक्ति”. संस्कृतप्रचुर मराठी म्हटलं की काही हिमालयासम उत्तुंग नावे प्रकर्षाने मनात येतात त्यांच्यापैकी मोरोपंत, वामन पंडित, स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर. अर्थातच ही यादी इथे संपत नाही पण ही हिमालयाची शिखरे आहेत हे मराठीचा रसिक नक्कीच मान्य करेल. आपल्या गंगोत्रीचा हात धरून ज्यांनी मराठीला […]
हाचि नेम आतां – संत तुकाराम महाराज (भावार्थ)
विराणी किंवा विरहिणी म्हटलं की सहज मनात येतात ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. पण किती जणांना हे ठाऊक आहे की संत तुकाराम महाराजांनी देखील विराणी रचलेल्या आहेत. उदाहरणार्थ “हाचि नेम आतां”! भारतीय अध्यात्मिक पद्य साहित्यात अनेक प्रकार आहेत. संत मंडळींनी रचलेल्या पद्य रचनांचा मूळ उद्देश सर्वसामान्य लोकांना समजेल आणि भावेल अशा भाषेत आपला संदेश पोहोचवणे हा […]
अगा करुणाकरा (संपूर्ण रचना आणि अर्थ) – संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत प्रसिद्ध तसेच करुणेने ओतप्रोत भरलेल्या अभंगांपैकी एक म्हणजे “अगा करुणाकरा”. भक्तिमार्गाचा उद्गम जरी द्वैतात असला तरीही त्याचे अंतिम ध्येय अद्वैतातच आहे! भक्ताने परमेश्वराशी एकरूप होण्याशी याचा संबंध आहे. परमेश्वर देखील भक्ताची परीक्षा घेत असतो. या परीक्षेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना देखील सामोरे जावे लागले. भक्त तर “भेटि लागी जीवा” म्हणत परमेश्वर प्राप्तीकडे […]
स्वातंत्र्याच्या वीरा आम्हां – गोपाळ गोडसे (सावरकरांवरील कविता)
नथुराम गोडसे यांचे बंधू श्री गोपाळ गोडसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा घेऊन काही काव्ये रचली. त्यांच्यापैकी हे एक काव्य. तात्याराव सावरकर फक्त एक क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्यसेनानी नसून एक राष्ट्रचिंतन आहे, एक समाजचिंतन आहे आणि अक्षय्य प्रेरणास्रोत आहे. सावरकरांच्या चरित्रातील काही अक्षरे समजून घ्यायची म्हटलं तरी देखील फार मोठं मानसिक सामर्थ्य आणि वैचारिक बैठक हवी. नाहीतर […]
काटा रूते कुणाला – कविता, किस्सा आणि रसग्रहण
काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी। मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे! हे शब्द कानी पडताच मराठी रसिकांच्या मनात आणि मुखात “वाह” किंवा “आह” या प्रतिक्रिया अगदी नैसर्गिकरित्या उमटली नाही तर त्याला रसिक म्हणावे की नाही अशी शंका मनात येईल. खरं सांगायचं तर, कवयित्री शांताबाई शेळके मराठी वाङ्मयाला लाभल्या, मराठी मातीत जन्माला आल्या हा एक दैवयोगच […]