राजकवी भा रा तांबे यांची “रिकामे मधुघट” किंवा लोकांना परिचित असलेले शीर्षक म्हणजे “मधु मागसि माझ्या सख्या परि” ही कविता माहित नसलेला मराठी शोधूनच काढावा लागेल. पण या कवितेचा हिंदी अनुवाद आहे हे किती जणांना माहित आहे? आज जुनी मासिके वगैरे चाळत असताना १९५९ सालच्या, हिंदी डायजेस्ट “नवनीत” मध्ये स्व. पंडित नरेंद्र शर्मा यांनी, मधू मागसि माझ्या, या कवितेचा केलेला अनुवाद वाचनात आला. आणि निश्चय केला की हा अनुवाद शब्दयात्रींपर्यंत पोहोचवलाच पाहिजे!
मधु माँग ना मेरे मधुर मीत, मधु के दिन मेरे गये बीत !
मैँने भी मधु के गीत रचे,
मेरे मन की मधुशाला मेँ
यदि होँ मेरे कुछ गीत बचे,
तो उन गीतोँ के कारण ही, कुछ और निभा ले प्रीत ~ रीत !
मधु माँग ना मेरे मधुर मीत, मधु के दिन मेरे गये बीत !
मधु कहाँ , यहाँ गँगा – जल है !
प्रभु के चरणोँ मे रखने को ,
जीवन का पका हुआ फल है !
मन हार चुका मधुसदन को, मैँ भूल चुका मधु भरे गीत !
मधु माँग ना मेरे मधुर मीत, मधु के दिन मेरे गये बीत !
वह गुपचुप प्रेम भरीँ बातेँ,
यह मुरझाया मन भूल चुका
वन कुँजोँ की गुँजित रातेँ
मधु कलषोँ के छलकाने की, हो गयी , मधुर बेला व्यतीत !
मधु माँग ना मेरे मधुर मीत, मधु के दिन मेरे गये बीत !
मधु मागसि माझ्या सख्या परि, या गाण्याची मोहिनी अजूनही कायम आहे. पण हा हिंदी अनुवाद देखील वाखाणण्याजोगा आहे. अर्थातच पंडित नरेंद्र शर्मा एक चांगले कवी होतेच. तसेच अध्यात्माची जोड असल्याने त्यांना हिंदी अनुवाद करताना भा रा तांबे यांनी अध्यात्माचे पकडलेले धागे, पंडितजींना देखील सापडलेले आहेत! माझी खात्री आहे रसिकांना हा अनुवाद आवडला असेल . आणखीन लोकांपर्यंत पोहोचवा. चांगल्या कविता, चांगले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवा!
खाली मधु घट चे नवनीत मासिकातील पान देत आहे.
