February 18, 2025
चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे

चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे

Spread the love

आज २९ ऑगस्ट, इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन सुद्धा. इन्ग्रिड बर्गमन मला आधीपासून माहित होतीच पण तिचा आणि माझा, माझ्या माहितीपेक्षा अधिक जवळचा संबंध आहे हे नंतर समजलं. माणिक गोडघाटे नावाच्या कवीने स्वतःसाठी “ग्रेस” हे टोपणनाव का निवडले? याबद्दल मला कायम कुतुहल वाटायचे. त्याचे उत्तर ग्रेसने एका मुलाखतीत दिले. की इन्ग्रिड बर्गमन यांचे वर्णन करताना “शी इज इन ग्रेस” हे वाक्य आले आणि ग्रेस, “ग्रेस” झाले. ग्रेस माझ्या मनाच्या अत्यंत जवळ आहेत. असो..

पण मला कवी म्हणून अनेक जण विचारतात की “चेहरा बोलतो का?” आणि मी कायम उत्तर देतो, “चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे”.

विषय इन्ग्रिड बर्गमनचा निघाला आहे तर एक गम्मत सांगतो की मला देखील काही फार सुंदर अभिनेत्रींचे चेहरे पाहून काही शब्द पूर्वी सुचलेले आहेत. त्यातल्या काही चेहरे आणि शब्द सादर करतो 🙏🏻

वनराणी

काही काही गोष्टी , कथा अशा असतात की त्यातल्या व्यक्तिरेखा मनावर एखाद्या गोंदणासारख्या कोरल्या जातात. मन त्या व्यक्तिरेखेचा चेहरा एक परिमाण म्हणून मानू लागतो. कधी कधी हे रेखाटन इतकं गडद होतं की दुसऱ्या कुठल्याही कथेत वा प्रसंगात फक्त तेच रेखाटन मनाला बघायचं असतं. तसाच काहीसं माझ्याही मनाचं झालंय.. माझ्या मनावर कैक वर्षांपूर्वी कोरलं गेलेलं रेखाटन म्हणजे जीत रे जीत मधली ती ‘वनराणी’

हा चांदवा टपोर भारी
अशा वाटा माळरानी
नदीचे पैंजण पायी
आली कुठून ही वनराणी !

बाभळीचे तुडवी काटे
अंगात झऱ्याची ओढ
पायात नभाचे तोडे
नजरेत कपारी वेध

ती आली झरझर खाली
झाडून काळोखी जाळी
सोडून घराची चौकट
तोडून शपथ ती काळी

इथे अल्याड डोंगरमाथा
अन पल्याड सागरभरती
वादळाला उभी धरून
एकटी ती खडकांवरती

गेली वाहून जी कधीची
आता ना परतायाची
काजळाचा करून चंद्र
ओलांडली वेस गावाची !

“तकदीर”

जंगली मधील सायरा बानो
ये कैसा मज़ाक है तकदीर का
मैं कही मेरा दिल कहीं ..

ईन आँखोंसे हुवे है जख्म जो
छुपते नही भर जाते भी नही ..

न जाने कैसे ये भूल हुई
मेरी दुनिया कहीं तेरा हुस्न कहीं
यह बला है या तूफ़ान
तिनके तिनके कर के कई दिल
जो अपने पीछे छोड़ आई ..

लोग पूछते हैं , कौनसे नशेमें
मैं आज कल धुत रहता हूँ ?
वोह क्या जाने ,
यह शिशे के जाम कहीं और मेरा यार कहीं …
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *