Albatross आणि ग्रेस Albatross एक समुद्री पक्षी आहे ज्याच्याबद्दल मी केवळ ऐकून होतो. पण जेव्हापासून कवी ग्रेस ने या पक्ष्याच्या नावाने फ्रेंच कवी Charles Baudelaire यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख केलेला वाचला तेव्हापासून जणू ही कविताच Albatross बनून माझ्या डोक्यात घिरट्या घालत होती. आज योग्य आलेला आहे त्या कवितेबद्दल आणि त्या कवितेतील अर्थाबद्दल माझे विचार मांडायचा. […]
सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही – आरती प्रभू
“सर्सर सर्सर वाजे” आरती प्रभू यांची एक अप्रतिम निसर्गकविता जिला मानवी अनुभवविश्वाचे संदिग्ध गोंदण लाभले आहे. आरती प्रभू म्हणजे अर्थातच खानोलकर यांच्या कवितेत कायमच एक प्रकारची अस्वस्थता, उणीव आणि रुखरुख जाणवते. आरती प्रभू अस्सल हाडाचे कवी आणि कलावंत होते. एखाद्या कलावंताचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि अनुभवले. कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा मनस्वी कवी नेहमीच […]
नेणीव म्हणजे काय?
“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
ये रे घना, ये रे घना – आरती प्रभू – रसग्रहण
काही काही गाणी मराठी मनात अगदी खोलवर रुजलेली आहेत. इतकी की गाण्याच्या सुरुवातीचा संगीताचा नुसता एक स्वर जरी ऐकवला तरीही संपूर्ण गाणं मनातल्या मनात आपोआप सुरु होतं एखाद्या रेकॉर्ड प्लेअर सारखं. त्याच मनातल्या ऑल टाईम फेव्हरिट गाण्यांच्या यादीतले एक गाणे म्हणजे “ये रे घना, ये रे घना”! चिं त्र्यं खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांचे शब्द, […]
बीज अंकुरे अंकुरे – रसग्रहण आणि भावार्थ
“बीज अंकुरे अंकुरे” कुणाला माहित नसलेला ८० आणि ९० च्या दशकात वाढलेला मराठी माणूस शोधूनच काढावा लागेल. मधुकर पांडुरंग आरकडे यांची ही अप्रतिम कविता! ही कविता मराठी पाठ्यपुस्तकात तर होतीच आणि “गोट्या” नावाच्या मराठी मालिकेचे शीर्षक गीत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे! अशोक पत्की यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलेले आहे. हे गाणे आणि हे शब्द […]
खुळा पाऊस – कवी गिरीश – थोडे विश्लेषण
“खुळा पाऊस”, खरे तर प्रत्येकाने लहानपणी अनुभवलेली ही कवी गिरीश यांची कविता. कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर. कवी गिरीश, रविकिरण मंडळाचे सदस्य होते. आजच्या पिढीला दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. जी काही माहिती आहे ती इंटरनेट वर सापडणारीच. पण कावीळ समजून घ्यायचे असेल तर कोण्या त्रयस्थ माणसाने केलेले वर्णन वाचण्यापेक्षा त्या कवीने लिहिलेली कविता […]
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा (संपूर्ण कविता) – वसंत बापट
कविवर्य वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ साली कराड येथे झाला. सामाजिक आणि भावनिक अशा दोन्ही रुळांवर बापटांची कविता अगदी मनस्वीपणे धावली. कधी “येशील येशील राणी” असे प्रेयसीला पहाटे चोरून यायला बोलावत तर कधी “केवळ माझा सह्यकडा” असा महाराष्ट्राभिमान गर्जत, कधी “गगन सदन तेजोमय” भक्ती गीत गात तर कधी, “आई आपल्या घराला किती मोठं […]
पांढरे हत्ती – कवी ग्रेस – अर्थ आणि भावार्थ
ग्रेस! नुसते नाव वाचले तरी माणूस हळूहळू आपल्या विश्वातून एका अव्यक्त भावनांच्या राईत प्रयाण करू लागतो. प्रत्येक शब्द जणू एक लोलक आहे ज्याला अनंत पैलू आहेत. रसिक संदर्भांच्या खिडक्यांतून विविध पैलू बघत बघत एका अनंत प्रवासात निघून जातो. कवी ग्रेस यांच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत हे म्हणणं म्हणजे सूर्याला ‘तो बघा सूर्य’ म्हणण्यासारखं आहे. […]
सेनापती बापट यांची कविता “देशाचा संसार”
थोर स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांच्याबद्दल मराठी जनमानसात खूप कमी माहिती आहे. हे आपले दुर्दैव आहे की इतक्या मोठ्या क्रांतिकारकाबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही. इतकेच काय, सेनापती बापट यांनी कविता देखील रचलेल्या आहेत हे किती जणांना माहित आहे? क्वचितच कोणाला सेनापती बापटांच्या कवितांबद्दल माहिती असेल. मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर एक प्रखर स्वातंत्र्यसैनिक […]
सुंदरा मनामध्ये भरली – शाहीर रामजोशी – संपूर्ण लावणी
“सुंदरा मनामध्ये भरली” या सुप्रसिद्ध लावणीचे रचनाकार शाहीर रामजोशी! महाकवी मोरोपंत यांनी ज्यांना कविप्रवर म्हणून संबोधले ते रामजोशी. ज्यांच्या काव्यावरून केशवकरणी हा छंद निर्माण झाला ते शाहीर रामजोशी. राम जगन्नाथ जोशी म्हणजेच शाहीर रामजोशी, पेशवेकाळातील एक उत्तुंग कवी, कीर्तनकार. “वेदशास्त्रसंपन्न शाहीर” म्हणवण्याचा मान बहुदा रामजोश्यांनाच मिळू शकेल. सोलापूर येथे एका वेदोक्त ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला […]