व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “कब्जा” मूळ तुर्की शब्द कब्झा (हत्याराची मूठ) वरून आलेला आहे.
पूर्वीच्या काळी जेव्हा युद्ध आणि शस्त्रांचा वापर अधिक होता तेव्हा, ज्याच्या हातात शस्त्र तो बलाढ्य हेच समीकरण होते. त्यामुळे या शास्त्रावरील मुठीत शक्ती आहे हे सिद्ध झालेच पण धरणाऱ्याच्या मुठीत देखील शक्ती आली. त्यामुळे मराठीत बाळाच्या जोरावर हिसकावून घेतलेली गोष्ट कब्जा केलेली (बळकावलेली) गोष्ट म्हटले जाऊ लागले.
शब्द-प्रयोग:
गुंडांनी रामलालच्या जमिनीवर अवैध कब्जा केला.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]