व्युत्पत्ति:
खबर म्हणजे बातमी आणि अखबार म्हणजे वर्तमानपत्र हे सगळ्यांना माहित आहे पण. मूळ अरबी भाषेत (जिथून खबर हा शब्द आलाय) अखबार म्हणजे “खबर”चं अनेकवचन, वर्तमानपत्र नव्हे!
मराठीत “खबर घेणे” म्हणजे जाब विचारणे किंवा दटावणे या अर्थाने देखील वापरला जातो.
शब्द-प्रयोग:
बरेच दिवस मुंबईकरांची काही खबर नाही.
मास्तरांनी दंगेखोर मुलांची चांगलीच खबर घेतली.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]