व्युत्पत्ति:
‘फलाट’ हा मराठी मध्ये रोज वापरला जाणारा शब्द इंग्रजी “प्लॅटफॉर्म” या शब्दाचा अपभ्रंश आहे. भारतात रेल्वे आल्यानंतर हा शब्द अधिक प्रचलित झाला.
संस्कृत मध्ये त्याला मंचक असा शब्द आहे.
शब्द-प्रयोग:
संगमनेरची गाडी फलाट क्रमांक ५ वर लागते.
त्या सकाळी फलाटावर फक्त विद्यार्थी दिसत होते.