व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “बक्षीस” मूळ फारसी शब्द बख्शीश (अर्थ तोच) वरून आलेला आहे.
बख्शीश शब्दाच्या मुळाशी बख्श म्हणजे “देणे” किंवा “प्रदान करणे” किंवा “वाटणे”. मुसलमानी राजवटीत सैन्याला पगार किंवा सामग्रीची वाटणी करून देणाऱ्या लोकांना “बक्षी” म्हणत. पुढे पुढे भारतावर जेव्हा परकीयांचे राज्य आले तेव्हा वाटणी करणारे भारतीय असले तरीही हा हुद्दा तसाच राहिला. यावरूनच “बक्षी” हे आडनाव रूढ झाले. बक्षीस शब्दाचे धागेदोरे असे रोचक आहेत!
शब्द-प्रयोग:
उत्तम अभ्यास केल्यावर आई बाबांनी रामला बक्षीस दिले.
सांगितलेली वेळ न पाळणाऱ्यांना “बक्षीस” दिले गेले पाहिजे.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]