November 14, 2024

बदमाश

व्युत्पत्ति:

मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “बदमाश” मूळ फारसी शब्द बदमाश (अर्थ तोच) जो फारसी शब्दसंधी बद (वाईट) + मुआश (जीविका) वरून आलेला आहे.

थोडक्यात वाईट मार्गाने जीविका कमावणारा माणूस किंवा हेराफेरी करणारा माणूस म्हणजे बदमाश! फारसी मध्ये शक्यतो आर्थिक हेराफेरी करणार्‍यांना बदमाश म्हणतात. पण मराठीत चोर, उचले, गुंडगिरी करणारे यांना देखील बदमाश म्हटलं जातं.

शब्द-प्रयोग:

पाववाला पक्का बदमाश निघाला!
नेत्यांनी वाट्टेल तशी बदमाशी करून माया जमवली!

Free Gangster Man photo and picture

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]