कुणाला काय आवडेल? आणि कुणाला कशाचा तिटकारा वाटेल? सांगता येत नाही. कधी कधी तत्त्वांच्या आहारी (!) गेल्याने परिप्रेक्ष्य धूसर होऊन जातो. तसंच काहीसं मनाला वाटून गेलं जेव्हा काही मंडळींनी नरेंद्र मोदींच्या पुतळ्याला श्रद्धेने नमस्कार केला आणि काहींनी (जवळजवळ सगळ्यांनी) मनापासून या गोष्टीचा तिरस्कार केला.
भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर […]