एक जुनी झेन कथा आहे. एकदा एक तरुण संन्यासी शांती च्या शोधात आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, “मला आत्मज्ञानाची खूप ओढ आहे, पण माझे मन स्थिर होत नाही. मला शांती कशी मिळेल?” गुरू हसले आणि म्हणाले, “चल, माझ्यासोबत ये.” त्यांनी संन्यासीला एका नदीकाठावर नेलं. नदी खळखळ वाहत होती. गुरू म्हणाले, “ही नदी पाहा. ती कधी […]
झेन कथा मराठीत – संयमी योद्धा
ही झेन कथा आहे एका योद्धाची, संयमी योद्धाची! पूर्वी जपानमध्ये एक उत्तम तलवारबाज होते. त्यांची ख्याती मोठी होती. याला आणखीन एकच कारण म्हणजे, ते झेन मास्टर देखील होते. झेन मास्टर आणि उत्तम तालवारबाज, वयाने ज्येष्ठ आणि प्रावीण्याने श्रेष्ठ त्यामुळे त्यांची चांगलीच ख्याती होती. त्याच काळात आणखीन एक तलवारबाज होता. उत्तम होता. त्याची एक सवय होती. […]
चहा घ्या! – झेन कथा मराठीत
पूर्वी जपानमध्ये एक जोशु नावाचे एक गुरु होऊन गेले. जोशु गुरु त्यांच्या दुर्बोध सवयींसाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येकाला “चहा घ्या” असं म्हणत चहा देत असत. बाकी काही विषय वाढत नसे! एकदा एक प्रवासी जोशुंकडे आला. जोशु गुरु सगळ्यांना चहा देत होते. त्यांनी अनोळखी प्रवासी माणसाला विचारले “अनोळखी माणसा, आपण याआधी भेटलो आहोत […]

झेन कथा मराठीत – आंधळा आणि कंदील (Blind man and Lantern)
एकदा एक आंधळा माणूस दुपारी एका मित्राकडे भेटायला गेला. गप्पा मारता मारता रात्र झाली, अंधार पडला. आंधळा माणूस घरी जायला निघतो. आंधळा माणूस आणि त्याच्या मित्राच्या घराच्या मध्ये एक जंगल असते. हा माणूस घरी जायला निघणार तेवढ्यात त्याचा मित्र त्याला थांबवतो आणि म्हणतो “मित्रा अंधार पडलाय थांब जरा” असं म्हणून एक कागदी कंदील घेऊन येतो […]

झेन कथा मराठीत – हत्ती आणि आंधळे (Lord Buddha’s Teachings)
एकदा वेगवेगळे धर्म आणि पंथ मानणाऱ्या काही लोकांमध्ये खूप वादावादी झाली. प्रत्येक जण “आमचाच देव खरा आहे आणि आमचीच देवाची व्याख्या खरी आहे” या मतावर ठाम होते. त्यांच्यातला वाद विकोपाला गेला तेव्हा त्यांनी गौतम बुद्धाकडे जायचं ठरवलं. गौतमाने शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकलं आणि शिष्यांना एक सुंदर हत्ती व चार आंधळ्यांना घेऊन यायला सांगितलं. काही वेळाने […]
झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong)
झेन गुरू बांकेई यांच्या ध्यानसाधनेच्या मठात जपानमधील अनेक झेन पंथाचे अनेक शिष्य आणि पालन करणारे सामील होत असत. एकदा अशा मेळाव्यात बरेच जण सामील झाले होते. एक शिष्य चोरी करताना पकडला गेला. इतर शिष्य, चोरी करणाऱ्या शिष्याला मठातून काढून टाकण्यासाठी तक्रार घेऊन बांकेईंकडे गेले. पण बांकेई गुरूंनी त्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पण पुन्हा एकदा तोच शिष्य चोरी करताना पकडला गेला. आता मात्र इतर शिष्य […]