Month: November 2022

Transit of Venus – शुक्र पारगमन आणि काही आठवणी
चौकटीतले विश्व, ब्लॉग, मुक्तांगण

Transit of Venus – शुक्र पारगमन आणि काही आठवणी

काल म्हणजे २४ नोव्हेंबर २०२२, मी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी इतिहासात काय झालं याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. तेव्हा मला हे पान सापडले. या पानावर Jeremiah Horrox या खगोलशास्त्रीच्या मित्राला म्हणजे William Crabtree नावाच्या एका विणकाराला Transit of Venus किंवा शुक्राचे पारगमन बघताना दाखवले आहे. Jeremiah ने आपल्या मित्राला हे पाहायला सांगितले होते. त्याचे […]

Read More
आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान
ब्लॉग, मुक्तांगण

आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान

“आ नो भद्राः क्रतवो” आणि आपली सोय “आ नो भद्राः क्रतवो” एक वाक्य जे मी, हातातल्या पत्त्यांसारखे फेकलेले आहे, अनेकांनी सोयीस्कररीत्या वापरलेले आहे. “अहिंसा परमो धर्म:” या अर्धवट श्लोकाबद्दल माहिती असेलच! भारताला आणि भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दल विशेष काही माहिती नसते. त्याहूनही भयंकर परिस्थिती संस्कृत ग्रंथांबद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल आहे. लोक लगेच म्हणतील की “तुम्हीच शिकवलं नाही”. […]

Read More
कला म्हणजे काय? – एक विचित्र उदाहरण
ब्लॉग, मुक्तांगण

कला म्हणजे काय? – एक विचित्र उदाहरण

कला म्हणजे काय? “कला” समस्त मानव प्रजातीला प्रत्येक पिढीला पडणारा एक सनातन प्रश्न. आज पुन्हा या प्रश्नाच्या मृगजळात काही काळ यथेच्छ डुंबून घेतलं. ट्विटरवर एक ट्विट पाहिला ज्यात काही चित्रांची अनेक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे असं सांगण्यात आलं होतं. अर्थातच जेव्हा कुठल्या कलाकृतीला एवढी किंमत मिळते तेव्हा चकित व्हायला होतं. कलाकार म्हणून थोडा आनंद पण […]

Read More
लोकमान्य टिळकांचे किस्से
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग, लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांचे किस्से

नमस्कार, लोकमान्य टिळक हे नाव माहित नसलेले लोक शोधूनच काढावे लागतील. पण आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या “टरफले” आणि “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” किंवा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” अशा दोन तीन गोष्टी सोडल्या तर विशेष काहीच माहित नसतं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासकारांनी लोकमान्य टिळकांना फक्त केसरी, मराठा, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहेत. […]

Read More
त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर
इतिहास/आख्यायिका, फेरफटका, ब्लॉग, मुक्तांगण

त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर

त्रिशुंड गणपती – थोडी पार्श्वभूमी काही कलाकृती, काही जागा आणि काही मंदिरे दुर्दैवाने अपरिचित राहतात. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे असेच एक अत्यंत अपरिचित, दुर्लक्षित आणि अद्भुत मंदिर! १७५४ च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. हिंदू मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत. हिंदू मंदिर ही कला, श्रद्धा आणि इतिहास यांचा […]

Read More
भवानी पेठेचा इतिहास आणि थोरले माधवराव पेशवे
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

भवानी पेठेचा इतिहास आणि थोरले माधवराव पेशवे

महाराष्ट्रातील उद्योगधंदे, त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि इतर समस्या यांच्यावर सध्या फार चर्चा सुरु आहे. नगर आणि उद्योग यांचा इतिहास माहित असणारे जाणतात की कोणतेही उद्योग उभे करणे, सुरु ठेवणे हे फार मोठे आव्हान आहे. इतिहासातील प्रत्येक काळातील राज्यकर्त्यांना हे आव्हान पेलावे लागले आहे. उद्योगधंदे आणि पेठ वसवणे सोपे नसते. उद्योगधंद्यांना देखील सवलती आणि राजकीय […]

Read More